सिटीचौक रस्त्यावरील 53 अतिक्रमणे काढली...!
सिटीचौक रस्त्यावरील 53 अतिक्रमणे काढली
औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) सिटी चौक रस्त्यावरील जवळपास 53 अतिक्रमणे काढण्यात आली आहेत.
आज मनपा अतिक्रमण विभागामार्फत सिटी चौक ,कपडा बाजारच्या दुकानदारांनी रस्त्यावर बांधलेले ओटे तोडण्यात आले. सदरची कार्यवाही सकाळी 10 वाजेपासून सुरू करण्यात आली होती. सर्व प्रथम अत्तर गल्लीत मिळकत धारकांनी सार्वजनिक गल्लीत बांधकाम करून गल्ली अरुंद केल्याने नगररचना विभागामार्फत मार्किंग सुरू करण्यात आली. परंतु तांत्रिक अडचणीमुळे मार्किंग होऊ शकली नाही. दिनांक 30 एप्रिल रोजी याच भागात अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान राहिलेल्या दुकानासमोरील ओटे पायऱ्या निष्काशीत करून पादचाऱ्यांना होणारी अडचण दूर करण्यात आली असून आज सुमारे 53 दुकानांच्या पायऱ्या व ओटे निष्काशीत करण्यात आले आहे. तसेच शहागंज येथील 4 हातगाड्यांवर कार्यवाही करून जप्त करण्यात येऊन इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले.
तसेच सिटीचौक येथे फुल विक्रेते यांचे 2 लोखंडी टेबल जप्त करण्यात आले. सदर कार्यवाही आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त सविता सोनवणे ,सहाय्यक आयुक्त झोन 2 रमेश मोरे ,नगररचना विभागाचे अभियंता राहुल मालखेडे, इमारत निरीक्षक मोहम्मद मजहर अली, सागर श्रेष्ठ ,शिवम घोडके प्रदीप चौरे यांनी पार पाडली .सिटीचौक, गुलमंडी ,रंगार गल्ली हा परिसर अत्यंत वर्दळीचा असल्याने सामान्य लोकांना होणारा दररोजचा त्रास दूर होणे करिता मनपा प्रशासनाने सदरची कार्यवाही उद्या पण राबविण्याचा निर्णय घेतला असून दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर असलेले अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?