उध्दव ठाकरेंचा आत्मा आदीत्यमध्ये तर शरद पवारांचा आत्मा सुळेंमध्ये अडकला - चंद्रशेखर बावनकुळे

मोदी सरकार वर विश्वास आहे त्यामुळे मराठवाड्यातील जनता मोदी सोबत आहेत, वचन नाम्याला प्रतिसाद मिळत आहे...
औरंगाबाद,दि.2(डि-24 न्यूज) प्रत्येकाला वाटत निवडणूक लढवावी. ठाण्याची आणि नाशिक जागा आम्हाला लढवण्याची इच्छा होती. काही जागा आम्हाला तर काही जागा एकनाथ शिंदे यांना लढवायच्या होत्या. मात्र मोठा भाऊ आम्ही असल्याने लहान भावांना घेऊन सोबत जात आहेत. शिंदेंचे 13 खासदार सोबत आले होते त्यांना 15 जागा देण्यात आले. अजित पवार यांचे एक खासदार सोबत आले होते त्यांना पाच ते सहा जागा देण्यात आले. महायुतीत मोठा विचार करावा लागतो. उध्दव ठाकरे सत्तेच्या लालासेपोटी कुठल्याही स्तरावर जावू शकतात. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर दुकान बंद करू असे सांगितले होते. त्यांचे वाक्य उध्दव ठाकरे यांनी लक्षात ठेवले असते तर बरे झाले असते. त्यांनी त्यांचे ऐकले नाही सत्तेसाठी विचार सोडून काँग्रेस सोबत गेले त्यांना मुलाची तर शरद पवार यांना मुलीची चिंता आहे. उध्दव ठाकरे सोनियाच्या दरबारी जाऊन बसले, औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेची स्थापना झालेला उद्देश बाजूला सोडून सत्तेसाठी गेले. आपल्या मुलाचं भवितव्यासाठी सत्तेत जाण्यासाठी कुठेही जाऊ शकतात हे महाराष्ट्राने पाहिले.
महाराष्ट्रात 14 कोटी जनतेने सर्वे मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना चांगली पसंती दिली आहे.
शरद पवारांचा आत्मा फिरत आहे, काँग्रेसला धोका दिला. त्यांचे जीवन घर, पक्ष फोडण्यात गेले. महाराष्ट्राला अविकसित ठेवणे, कधी वेगवेगळ्या समाजावर अन्याय करणे असं केले. ठाकरे यांनी सत्तेसाठी केले तर पवार यांनी सत्तेसाठी तडजोडी केल्या. ममता बॅनर्जी यांनी स्वतःच सत्ता स्थापन केली अनेक पक्षांनी सत्ता मिळवली, मात्र शरद पवार यांनी कधी सत्ता स्थापन केली नाही. महाराष्ट्राच्या जनतेने कधी त्यांना स्वीकारले नाही. मोदीजी स्थिर सरकार मध्ये आहेत. आणि अभिमान आहे ते पंतप्रधान उमेदवार आहेत. ते फिरत असल्याने त्रास आहे.
272 + खासदार लागतात काँग्रेस 240 लढत आहेत. पंतप्रधान झाला तर याला त्याला घेऊन करावा लागेल. ते स्थिर सरकार देऊ शकत नाही ते फक्त असे लोक काय करणार.
बारामती वाचवून दाखवा. तिथून ते बाहेर पडू शकत नाही. एक जागा अवघड जात आहे. पवार साहेबांनी इतके वर्ष घालवले, मात्र रस्त्यावर फिरावे लागत आहेत. हे दुर्दैव आहे.
मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहे म्हणून ते फिरतात. एक पंतप्रधान थेट नागरिकांशी संवाद साधतात याचा अभिमान आहे. सर्व देशात फिरत आहेत. गुजरात, राजस्थान सगळ्या राज्यात जातात. त्यांना उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारखी घरी बसण्याची सवय नाहीं.
उध्दव ठाकरे बद्दल काय बोलणार त्यांचा आत्मा आदित्य मधे, शरद पवार यांचा आत्मा सुप्रिया मध्ये अडकलेला आहे. राहुल गांधी निवडणुका झाल्या की इटली युरोप मध्ये जाऊन आराम करतील. मात्र मोदीजी तसे नाही ते रोज काम करतात. त्यांनी 2019 मध्ये मोदींचा फोटो वापरून 18 खासदार निवडून आणले आता त्यांनी इतक्या जागा आणून दाखवाव्यात अन्यथा दुकान बंद करावे. मोदीनी जे वचन 2014 आणि 2019 मध्ये वचन दिले ते पूर्ण केले 2024 मध्ये दिलेल्या वचननाम्याला पसंती मिळत असल्याने महाराष्ट्रातील जनता मोदींच्या पाठीमागे आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले अभिजित पाटील सोबत आहेत.
मतांसाठी उध्दव ठाकरे यांचे बगलबच्चे काही करतात. कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात. आता उध्दव ठाकरे यांनी सनातन संपणाऱ्या सोबत जातात. राम मंदिर बाबत निमंत्रण असताना ते गेले नाही. त्यांनी नीतिमत्ता घालवली. सत्तेसाठी ते काही करु शकतात असा आरोप बावनकुळे यांनी लावला.
What's Your Reaction?






