शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी, देशात अमन शांतीसाठी केली दुवा...!
 
                                शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी, देशात अमन शांतीसाठी केली दुवा...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.17(डि-24 न्यूज) आज देशभरात इद-उल-अजहा(बकरी ईद) उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात छावणी ईदगाह, रोझाबाग ईदगाह, उस्मानपुरा ईदगाह व आपल्या मोहल्ल्यात मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा करत देशाची प्रगती, अमन शांतीसाठी व पावसासाठी अल्लाह कडे दुवा केली. छावणीत हाफीज झाकीर यांच्यामागे नमाज पठण करण्यात आली. मौलाना नसीम मिफ्ताई, जमाते इस्लामी हिंदचे डॉ.जावीद मुकर्रम, ईदगाह कमेटीचे जावेद खान यांनी मार्गदर्शन करत कुर्बानीचे महत्त्व विषद केले. नमाज नंतर गळाभेट घेत ईदनिमित्त एक दुस-यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कुर्बानी करण्यात आली. अजून दोन दिवस कुर्बानी करण्यात येते
 
.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            