एसडिपिआयच्या आंदोलक कार्यकर्त्यांना अटक...

एसडीपिआयच्या आंदोलक कार्यकर्त्यांना अटक...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) -
हज हाऊस येथे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची बैठक सुरु असताना सकाळी 11.30 वाजता एसडिपिआयचे कार्यकर्ते दाखल झाले. आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांचे आंदोलन बेगमपुरा पोलिसांनी चिरडले. यावेळी अगोदरपासून पोलिसांचा फौजफाटा प्रभारी पोलिस निरीक्षक गिरमे यांनी तैनात केला होता. पुणे जिल्ह्यातील हवेली येथील बाणेर मस्जिदच्या जमीनीला विक्री करण्यास वक्फ बोर्डाने मान्यता दिल्याने एसडिपिआयचे कार्यकर्ते अक्रामक झाले. त्यांनी आरोप लावला या प्रकरणात 1200 कोटींचा घोटाळा झाल्याने वक्फचे सिईओ सय्यद जुनेद यांची सखोल चौकशी करावी. वक्फचे चेअरमन व सिईओ यांना बडतर्फ करावे. वक्फ बोर्डात भ्रष्टाचार वाढत आहे. सरकारने कार्यवाही केली नाही तर राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. वक्फ बोर्डाची बैठक संपेपर्यंत ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना बेगमपुरा पोलिसांनी सोडले नाही यानंतर कार्यवाही करुन सुटका केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष समीर शाह, जिल्हा सचिव मोहसिन खान, कोषाध्यक्ष रियाज सौदागर, सरफराज खान उपस्थित होते.
What's Your Reaction?






