ऐतिहासिक शहराचे नाव बदलण्याचा अधिकार सरकारला नाही, आज नामांतरावरावर जोरदार युक्तिवाद

 0
ऐतिहासिक शहराचे नाव बदलण्याचा अधिकार सरकारला नाही, आज नामांतरावरावर जोरदार युक्तिवाद

नामांतरावर सुनावणी पुन्हा 12 डिसेंबर रोजी

औरंगाबाद, दि.8(प्रतिनिधी) दुसऱ्या दिवशी दुपारी औरंगाबाद शहर नामांतर याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पुन्हा झाली. आज वेळ कमी असल्यामुळे काही मिनटात सिनिअर कौन्सिल अनिल अंतूरकर यांनी हिशाम उस्मानी यांच्या बाजूने युक्तिवाद केला. न्यायालयाने अंतुरकर यांना दोन प्रश्न विचारले. एक म्हणजे नामांतरावरावर कायदेशीर बाजू मांडा, दुसरा इतिहासावर न्यायालयाचा वेळ घालवू नका. अंतुरकर यांनी कायदेशीर बाजू मजबूतीने मांडतांना सांगितले की ऐतिहासिक शहराचे नाव बदलण्याचा अधिकार सरकारला नाही, यामध्ये कोणाच्या भावना अथवा राजकारण असू शकते असे काही मिनटात त्यांनी आपली बाजू न्यायालयात मांडली. अशी माहिती याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे.

या प्रकरणात आणखी सुनावणी मंगळवारी, 12 डिसेंबर रोजी होणार आहे यानंतरच निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. पण आजच्या युक्तिवादानंतर हिशाम उस्मानी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे आम्हाला न्याय मिळेल व ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे नाव वाचवण्यासाठी यश मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी एड एस.एस.काझी, एड खिजर पटेल, एड हबीब कादरी, मोईन शेख न्यायालयात उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow