शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन...

शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन...
मुंबई, दि.6(डि-24 न्यूज)- सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात 6 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने अद्याप पर्यंत शेतकऱ्यांसाठी कसलीही मदत जाहीर केली नसल्याने शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर भव्य आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये 50 हजार इतकी थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमुक्त करावे. पीक विम्याचे कठीण निकष पूर्ववत करून विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना, जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा, या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी व शिवसैनिक सहभागी होतील.
What's Your Reaction?






