मुस्लिम समाजाने स्किल्ड डेव्हलपमेंटच्या शिक्षणाकडे वळावे - डॉ.अबु सालेह शरीफ

 0
मुस्लिम समाजाने स्किल्ड डेव्हलपमेंटच्या शिक्षणाकडे वळावे - डॉ.अबु सालेह शरीफ

मुस्लिम समाजाने स्किल्स डेव्हलपमेंट शिक्षणाकडे वळावे - डॉ.अबु सालेह शरीफ

जग रोबोटिक कडे वाटचाल करत आहे विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे...

औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी लहानपणापासून बालकांना पोषण आहार, आरोग्य व बेसिक शिक्षणाकडे पालकांनी लक्ष द्यावे. देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्यासाठी परावृत्त करण्यासाठी आपल्या वस्त्यांमध्ये आदर्श समाज घडविण्यासाठी संस्थात्मक काम करण्याची सध्या गरज आहे. वस्त्यांमध्ये चांगले शाळा, अंगणवाडी व स्किल्स डेव्हलपमेंट शिक्षणाकडे सध्याच्या तांत्रिक युगात आवश्यक आहे. शैक्षणिक संस्थांनी एक जागेवर येऊन स्मार्ट क्लास निर्माण करुन स्मार्ट आजच्या युगात पुढे नेणारे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. मागासलेपणा मनात न ठेवता आपणच आपले आयुष्य आपल्या खडतर परिश्रमाने आपली व समाजाची प्रगती घडवण्यासाठी तत्परता दाखवली तर समाज मागे राहणार नाही. प्रत्येक निवडणुकीत शंबर टक्के मतदार नोंदणी व शंभर टक्के मतदान झाले पाहिजे राजकीय नेत्यांना पण वाटायला पाहिजे यांची संख्या किती आहे. शासनाच्या अनेक योजना समाज घडविण्यासाठी आहे तेथे नियमानुसार संधीचा फायदा घेत शिक्षण व नोकरीत पुढे यावे. इस्लाम धर्मातील शिकवणीनुसार इबादत अनिवार्य आहे त्यापासून वंचित न राहता पाच वेळची नमाज अदा करावी. असे अनमोल मार्गदर्शन भारत सरकारच्या सच्चर कमेटीचे सदस्य सचिव अति महत्वाच्या पदावर काम केलेले डॉ.अबु सालेह शरीफ यांनी केले आहे. सध्या ते अमेरिकेत वास्तव्यास आहेत.

आज मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विषयावर प्रकाश टाकण्यासाठी भारतरत्न मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे गुरुवारी सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शिक्षातज्ञ मुज्तबा फारुक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम रिझर्व्हेशन फ्रंट, महाराष्ट्र अध्यक्ष अजमल खान यांनी केले होते. प्रमुख उपस्थिती सुभाष लोमटे, जावेद मुकर्रम, इलियास फलही, मिर्झा सलिम बेग उपस्थित होते. सुत्रसंचलन सलाओद्दीन सर यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow