अशफाक सलामी यांच्या पत्रकार परिषदेत शाब्दिक चकमक...

 0
अशफाक सलामी यांच्या पत्रकार परिषदेत शाब्दिक चकमक...

अतिक्रमण कार्यवाई विरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा...!

एका नामांकित दैनिकाच्या पत्रकाराने प्रश्न विचारला तुम्ही जनतेची दिशाभुल करत आहे. उत्तर देताना अशफाक सलामी यांनी त्यांना म्हटले तुम्ही मनपा आयुक्त जी श्रीकांत यांची भाषा बोलत आहे असे बोलताच पत्रकार परिषदेत गोंधळ उडाला. सर्व पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली. सलामिंनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पत्रकार परिषद पुन्हा सुरु झाली... 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) - 

शहरात सुरु असलेली अतिक्रमण कार्यवाईच्या नावाखाली रस्ता रुंदीकरण व अनाधिकृत बांधकाम सर्रासपणे तोडण्याचे काम मनपा प्रशासन करत आहे. भुमि अधिगृहन कायदा आणि अनाधिकृत बांधकाम कायद्याचे उल्लंघन मनपा प्रशासन करत आहे. शहरातील काही माजी नगरसेवक, जेष्ठ नागरीक, त्रस्त नागरीकांची एक बैठक भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बेकायदेशीर सुरु असलेली अतिक्रमणाची कार्यवाई थांबवावी या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने जन आंदोलन उभारण्याचा इशारा पत्रकार परिषदेत भाकपाचे माजी नगरसेवक अशफाक सलामी यांनी दिला आहे.

यावेळी भाकप प्रणित विश्रांतीनगर-जयभवानीनगर घरबचाव संघर्ष समीतीचे काॅ.मधुकर खाल्लारे, माजी नगरसेवक इलियास किरमानी, अॅड विजय वानखेडे, काॅ.अनिल थोरात उपस्थित होते.

मनपा प्रशासनाकडे त्यांनी मागणी केली रस्ता रुंदीकरण किंवा आरक्षित जागेसाठी भुमी अधिगृहन करत असाल तर कायद्यानुसार तंतोतंत करावा. भुमी अधिग्रहन केल्यावर प्रत्येक सिटी सर्वे नंबरवर संबंधित जागेचा पंचनामा करण्यात यावा. अनाधिकृत बांधकामाची पाहणी करुन व मोजणी करुन दंडात्मक कार्यवाई करावी. अतिक्रमण पाडण्याच्या तीन दिवस आधी रितसर नोटीस देवून स्थानिक वर्तमानपत्रात स्पष्ट उल्लेख असलेले जाहिर प्रगटन द्यावे. 2008 ते 2012 मध्ये सिल्लेखाना ते पैठण गेट ते गुलमंडी, गुलमंडी ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली होती. याचा अद्यापपर्यंत पंचनामा केला नसून एकूण किती भुखंड अधिग्रहण करण्यात आले मनपाकडे कसलाही हिशोब नाही त्याचा आजपर्यंत मोबदलाही देण्यात आलेला नाही.

विश्रांतीनगर- जयभवानी नगर व हर्सुल सारख्या भागातील गुंठेवारी व स्लम भागातील नागरीकांना मनपाने पर्यायी जागा देण्याचे सर्व साधारण सभेत प्रस्ताव पारीत केले होते. आश्वासनही दिले होते‌. सदरील फाईल शहर अभियंता यांच्याकडे आहे त्या फाईलचे काय झाले.‌..?

मनपाच्या सुरक्षा गार्डचा पोषाख आर्मी सारखा असल्याने शहरात धास्ती वाढली आहे. हा ड्रेसकोड बदलावा कायद्याने हा ड्रेस वापरता येत नाही अशी मागणी प्रसिध्दी पत्रकात करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow