अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मेळावा, 5 लाख उद्योजक घडविणार- अध्यक्ष नरेंद्र पाटील

 0
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मेळावा, 5 लाख उद्योजक घडविणार- अध्यक्ष नरेंद्र पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्जमेळावा

5 लाख उद्योजक घडविणार-अध्यक्ष नरेंद्र पाटील

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.4(डि-24 न्यूज)- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत एक लाख मराठा उद्योजक घडविल्यानंतर आता पुढच्या टप्प्यात 5 लाख उद्योजक घडविणार असल्याचा मनोदय महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व एम बी एन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कर्ज महामेळावा व उद्योजकीय प्रदर्शन आज आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी नरेंद्र पाटील बोलत होते. 

 श्रीहरी पॅव्हेलियन येथे आयोजित या मेळाव्यास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नरेंद्र पवार, विशाल कदम, मिलिंद पाटील,रमेश गायकवाड, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, सदाशिव जाधव, सहा आयुक्त कौशल्य विकास सुरेश वराडे, अपर पोलीस अधीक्षक जालना अशोक बनकर, उपायुक्त मनपा अंकुश पांढरे तसेच उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

 राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, अण्णासाहेब पाटील यांचे प्रतिमापूजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शिववंदना झाली. लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभ मंजूरीचे पत्र देण्यात आले.

 आपल्या संबोधनात नरेंद्र पाटील म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊन राज्यात एक लाख तर जिल्ह्यात 10 हजार उद्योजक तयार झाले. मराठा समाजातील तरुण प्रामाणिकपणे कर्ज फेडतात. याचे कारण कर्जावर जे व्याज लागते ते व्याज भरण्याचीच ही व्याज परतावा योजना आहे. व्याज परतावा योजने मुळे नव्या उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आजही या मेळाव्यात कर्ज सुविधा उपलब्ध आहे. या संधीचा लाभ तरुण उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

  ते पुढे म्हणाले की, यशस्वी उद्योजकांनी सामान्य व्यावसायिकाला पाठींबा द्यावा. त्यासाठी सामुहिक उपाययोजना कराव्या. लहान लहान व्यवसायातील माणसं मोठी करा. महामंडळामार्फत लहान उद्योजक, व्यावसायिकांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांना कर्ज उपलब्ध करुन देऊ. एक लाख उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर आता आगामी काळात 5 लाख उद्योजक घडविण्याचे आपले लक्ष्य असून त्यादिशेने आता महामंडळ प्रयत्न करील. येत्या काळात महामंडळ मोबाईल ॲप तयार करुन आपल्या सुविधा त्याद्वारे उपलब्ध करुन देऊन व्यावसायिक गुणवत्तेने महामंडळ काम करेल,असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांनी व्यवसायाची सुत्रे हाती घेऊन अर्थकारण समजून घ्यावे व अर्थकारणात प्रगती करावी. 

 यशस्वी उद्योजक नरेंद्र पवार यांनी तसेच लाभार्थी प्रदीप नवले यांनी आपले अनुभव कथन केले. प्रास्ताविक सुरेश शिंदे, सुत्रसंचालन हर्षाली देशमुख यांनी तर अरुण पेरे यांनी आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow