जालन्याचे मोटारसायकल मेकानिकची दुसरी मुलगीही बणणार डाॅक्टर...?

 0
जालन्याचे मोटारसायकल मेकानिकची दुसरी मुलगीही बणणार डाॅक्टर...?

जालन्याच्या शिफाच्या बहीनीचे नीट परिक्षेत यश....!

जालना, दि.14(डि-24 न्यूज) शेरसवारनगर झोपडपट्टी परिसरातील रहीवाशी उर्दु हायस्कुल ज्युनिअर काॅलेजची विद्यार्थीनी शहेरिश शेख युसुफोद्दीन हिने गरीबीवर मात करत नीट परीक्षा 2025 परीक्षेत 720 पैकी 447 मार्क घेत यश संपादन केले आहे. अगोदर बहीनीने यश मिळवून एमबीबीएसला प्रवेश मिळवला. तीच्या पावलावर पाऊल टाकत लहान बहीनीचे यश बघून सर्वत्र कौतूक केले जात आहे.

तीन वर्षांपूर्वी शेरसवारनगर येथील रहीवाशी मोटारसायकल मेकानिक शेख युसुफोद्दीन यांची जेष्ठ कन्या शिफा फिरदौसने गरीबीवर मात करत यश मिळवले होते. आई लेडीज टेलर आहे. जिद्द आणि चिकाटीमुळे शहेरिशला एमबीबीएस डाॅक्टरचं बनायचे असल्याने तिस-या प्रयत्नात हे यश तीने संपादन केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे एमबीबीएसच्या तिस-या वर्षात शिक्षण घेत आहे. अंकुश सरांचे शहेरिशला मार्गदर्शन लाभले. पालकांना विश्वास आहे दुसरी मुलगीही डाॅक्टर बनेल व एमबीबीएसला प्रवेश मिळेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow