विहित मुदतीत नूतनीकरण न झालेले मांस परवाने रद्द करण्यात येईल...!

 0
विहित मुदतीत नूतनीकरण न झालेले मांस परवाने रद्द करण्यात येईल...!

विहित मुदतीत नूतनीकरण न झालेले मांस परवाने रद्द करण्यात येणार...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.22(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या हद्दीत उघड्यावर विना परवाना मांस विक्री केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच विहित मुदतीत नूतनीकरण न झालेले मांस परवाने रद्द करण्यात येणार आहे.

 महानगरपालिका हद्दीतील सर्व मांस विक्रेते (बीफ/मटन/चिकन/मासोळी) यांनी आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार मांस विक्री परवानासाठी मनपाकडुन ना-हरकत प्रमाणपत्र घेवुन अन्न व सुरक्षा मानके अधिनियम २००६ व त्या अंतर्गत नियम व अधिनियम २०११ अन्वये अन्न व औषधी प्रशासनाकडुन मांस परवाना हस्तगत करण्यात यावा.

तसेच मांस विक्रेत्यांनी मोठी जनावरे (म्हैस, रेडा, वगार) अधिकृत कत्तलखाना पडेगांव व लहान जनावरे (शेळी, मेंढी, बोकड) अधिकृत कत्तलखाना शहाबाजार येथेच जनावरांची कत्तल करावी. कत्तलखान्यावर जनावरांची पासिंग करून जनावरे कत्तल केल्यानंतर देण्यात येणारी पावती व मांसावरील पासिंगचा शिक्का विक्रीस ठेवलेल्या दुकानात दाखविणे बंधनकारक आहे. या व्यतिरीक्त आढळुन आलेले मांस अनाधिकृत ठरवुन जप्त करून योग्यती विल्हेवाट लावण्यात येईल. उघड्यावर विना परवाना मांस विक्री करण्यात येवू नये. दुकानाच्या बाहेर मांस लटकवून सार्वजनिक रस्त्यावर नागरिकांना किळस येईल असे कृत्य करण्यात येवू नये. मनपाने घालुन दिलेल्या परवाना संबंधिच्या नियम, अटी व शर्तीचे उल्लंघन करण्यात येवु नये.

उघड्यावर विना परवाना मांस विक्री करताना आढळुन आल्यास संबंधित मांस विक्रेत्याविरूध्द महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ३८१,३८२ व जाहीर प्रगटनाचे अवहेलना केल्याबाबत संबधित पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि.कलम २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच 

विहीत मुदतीत नुतणीकरण न झालेले मांसपरवाने रद्द करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची सर्व सबंधित मांस परवाना धारकांनी गांभीर्याने नोंद घेण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow