आज किराडपुरा येथे इब्राहीम पटेल यांच्या प्रचारार्थ मौलाना मुफ्ती हारुन यांची जाहीर सभा
इब्राहीम पटेल यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक मौलाना मुफ्ती हारुन नदवी यांची जाहीर सभा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)- प्रभाग क्रमांक 12 चे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार इब्राहीम पटेल यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांना कटकट गेट, किराडपुरा व रहेमानिया काॅलनी, शरीफ काॅलनी येथील मतदारांची पसंती मिळत आहे. उद्या 12 जानेवारीला सायंकाळी 6.30 वाजता काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा काँग्रेसची बुलंद तोफ स्टार प्रचारक मौलाना मुफ्ती हारुन नदवी यांची जाहीर सभा फैज काॅम्पलेक्स, किराडपुरा त्यानंतर कटकट गेट, हाॅटेल शालिमार समोर येथे आयोजित केली आहे. या जाहीर सभेला खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष युसुफ शेख, जेष्ठ नेते इब्राहीम पठाण, एड सय्यद अक्रम, डॉ.सरताज पठाण, रमजानी खान, जमील खान, सहिर खान, ताहेर पटेल, रफीक पटेल, शाकेर पटेल, सदफ पटेल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मोठ्या संख्येने या सभेला प्रभागातील जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
What's Your Reaction?