दसरा सोहळा, इंडियन ऑईल न्यू इयर धमाका ऑफरमध्ये विजेत्यास बुलेट सुपुर्द...

दसरा सोहळा : इंडियन ऑईल न्यू इयर धमाका योजनेत बुलेट बाईक विजेत्यास सुपूर्द...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- दसर्याच्या शुभ मुहूर्तावर प्रगती पेट्रोलियम्स येथे इंडियन ऑईलच्या न्यू इयर धमाका योजनेतील विजेत्यास 2.5 लाख रुपये किमतीची बुलेट बाईक सुपूर्द करण्यात आली.
महापालिकेतील वाहनचालक श्री. संतोष सोनवणे यांनी केवळ 1000 रुपयांचे डिझेल भरून या योजनेत सहभाग घेतला होता. लकी ड्रॉमध्ये त्यांना मुख्य बक्षीस म्हणून नवी बुलेट बाईक मिळाली.
या सोहळ्यात बाईकची चावी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास दीपक कुमार सिन्हा, विभागीय रिटेल सेल्स प्रमुख, इंडियन ऑईल, रणजित पाटील, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका, अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी), महानगरपालिका तसेच गणेश खेत्री, सेल्स मॅनेजर, इंडियन ऑईल यांची उपस्थिती होती.
हा सोहळा दसऱ्याच्या उत्साहात ग्राहकांना दिलेल्या बक्षिसांनी आनंद द्विगुणित करणारा ठरला.
What's Your Reaction?






