शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने...

जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अलीकडील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)-जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली व खा.डॉ. कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.
शेतकऱ्यांचे पिके जसे की ज्वारी, बाजरी, मका, कापूस, सोयाबीन, भाजीपाला, ऊस, इत्यादींना मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे जीवन विस्कळीत झाले असून शासनाने मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आले.
पिकांचे पंचनामे तात्काळ करावेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी. विशेषतः ज्या शेतकऱ्यांचे शेतीसाठी साधनसामग्रीचे नुकसान झाले त्यांना भरपाई द्यावी. मृत झालेल्या जनावरांच्या नुकसानीबाबत तातडीने मदत करावी. प्रत्येक शेतकऱ्याला किमान ₹50,000/- मदत द्यावी. अशा प्रमुख मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, खा. डॉ. कल्याण काळे, विलासबापू औताडे, नामदेव पवार, डॉ. जफर खान, डॉ. सरताज पठाण, सय्यद अक्रम, अशोक डोळस, भाऊसाहेब जगताप, जगन्नाथ काळे, संदीप बोरसे, सुधीर मुळे, अनिस पटेल, सूर्यकांत गरड, विठ्ठल कोरडे, राहुल सावंत, भास्कर घायवट, दिलीप भोसले, रावसाहेब नाडे, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, मोईन इनामदार, डॉ. अरुण शिरसाट, योगेश थोरात, सलीम पटेल, अलीम सय्यद, जावेद पठाण, मोहसिन खान, जलील देशमुख, दिक्षा पवार, परवीन देशमुख, मोहसिन खान, अस्मत खान, गणेश शिंदे, अनिल नलावडे, संतोष मेटे, मेहबूब पठाण, पंढरीनाथ जाधव, सय्यद फय्याजोदीन, कैसर बाबा, मुझफ्फर खान, जगदीश पडोळे, अतिश पगारे, प्रकाश सानप, अर्जुन ठोंबरे, पप्पूराज ठुबे, इरफान गिराम, अंकुश कुटे, राजू सांगळे, हसण्योद्दीन कट्यारे, बाबासाहेब बोचरे, शेख मुनीर, बाबासाहेब हिवाळे, महेश वैध, अल्ताफ पटेल, शेख अथर, शेख इम्रान, इंदुबाई खरात, चंद्रप्रभा खंदारे, सदानंद खडसन, इक्बाल अहमद, कल्याण चव्हाण, पंढरीनाथ लहाने, पंढरीनाथ जाधव, इम्रान खान, राहुल मते, सवता गाडेकर, सोमनाथ पळसकर, शेख आवेज, शकील शहा, कय्युम पटेल, अनिल श्रीखंडे, नईम मन्सूरी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






