घाटी परिसरातील गरीबांच्या दुकानावर बुलडोझर चालू देणार नाही - संजय केनेकर
घाटी परिसरातील गरीबांच्या दुकानावर बुलडोझर चालू देणार नाही - संजय केनेकर
मंत्री अब्दुल सत्तार यांना दिव्यांगांना घातले साकडे... सांगितले मनपा आयुक्तांशी चर्चा करणार
औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) जूबली पार्क ते घाटी रुग्णालया दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग धोरणानुसार उदरनिर्वाहा करिता महानगरपालिकेचे भाडे आणि टॅक्स भरुन व्यवसायासाठी जागा दिल्या. अनेक वर्षांपासून दिव्यांग येथे व्यवसाय करत आहेत. कायदेशीर व्यवसाय करत असताना 11 महिन्याचे नुतनीकरण बंधनकारक करण्यात आले होते. मागिल एक वर्षापासून महापालिकेच्या वतीने दिव्यांगांच्या दुकानांचे नुतनीकरण केले नाही व अतिक्रमणाच्या नावाखाली दुकाने हटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. म्हणून आज अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार व भाजपाचे प्रदेश महासचिव संजय केनेकर यांना निवेदन देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी दिव्यांगांच्या शिष्टमंडळाने केले आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी आश्वासन दिले की मी स्वतः महापालिकेचे आयुक्त यांच्याशी चर्चा करणार आहे. तुम्ही काळजी करू नका. संजय केनेकर यांनी सांगितले गरीबांच्या दुकानावर बुलडोझर चालू देणार नाही. असे आश्वासन दिले. कायदेशीर पध्दतीने हे गरीब दिव्यांग व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. हे सरकार गरीबांचे आहे गरीब लोकांवर अन्याय करणारे नाही. असा शब्द यावेळी केनेकर यांनी शिष्टमंडळाला दिला.
What's Your Reaction?