रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सिल्लोडची जनता रस्त्यावर
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हजारो जनता रस्त्यावर ; बाजार पेठेत कडकडीत बंद
मोर्चात महिलांची संख्या होती लक्षणीय
दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा नसता याहून अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा
बेताल वक्तव्य थांबवा नसता रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन च्या घरावर मोर्चा काढण्यात येणार
रावसाहेब दानवे यांची भाजप मधून हकालपट्टी करण्याची मागणी
रावसाहेब दानवे यांना अटक झालीच पाहिजे आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
सिल्लोड,दि.19(डि-24 न्यूज) दि.19,सिल्लोड - सोयगावला वारंवार पाकिस्तानी असे वक्तव्य करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी सिल्लोड येथे तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला होता. त्यासोबत रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
रावसाहेब दानवे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजिंठा येथील आंदोलनात सिल्लोड सोयगावच्या जनतेला पाकिस्तानी म्हणत अपमानित केले होते. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित मोर्चात अक्षरशः जनसागर उलटला होता. हातात तिरंगा झेंडा घेवून रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची भाजप मधून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरून घोषणा देत होते.
दरम्यान मोर्चा तहसिल कार्यालय येथे आला असता आंदोलन कर्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत रावसाहेब दानवे व त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली.
दानवे यांचा सिल्लोडची बाजारपेठ संपविण्याचा डाव
जनता अपमान विसरणार नाही - मारुती पाटील वराडे
संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्यासारख्या प्रामाणिक समाजासाठी लढणाऱ्या व्यक्तीला तुम्ही "तुमच्या तोंडातून तुतारीचा वास येतो " असे बोलून अपमानित करतात. शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलून त्यांचा अवमान करतात ? जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली तर त्यांना पाकिस्तानी म्हणतात . जनता हा अपमान विसरणार नाही, तुम्हाला या जनतेने घरी बसवले आता रस्त्यावर आणेल असा इशारा मारुती वराडे यांनी दिला.
जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणून सिल्लोड ची ओळख आहे. शिवाय अतिशय झपाट्याने वाढणारे शहर म्हणून सिल्लोड ची ओळख आहे. सिल्लोडच्या जनतेत धार्मिक तेढ निर्माण करून सिल्लोड ची बाजारपेठ संपविण्याचा डाव रावसाहेब दानवे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा असल्याचा घणाघात मारुती पा वराडे यांनी केला. हा डाव सिल्लोड ची जनता कधीही पूर्ण होवू देणार नाही, हा प्रकार दानवे यांनी वेळीच थांबविला नाही तर सिल्लोड ची जनता त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा वराडे यांनी भाषणात दिला.
रावसाहेब दानवे यांची भाजपमधूम हकालपट्टी करा - केशवराव तायडे
सिल्लोड - सोयगावला वारंवार पाकिस्तानी म्हणणाऱ्या रावसाहेब दानवे यांचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. यामुळे पक्षाची देखील हानी होत असल्याने अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांची भाजपा मधून हकालपट्टी करावी अशी मागणी केशवराव तायडे यांनी केली.
सिल्लोड ला वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना सोडणार नाही - किशोर बलांडे
फुलंब्री तालुक्यातील काही भाग हा पूर्वी सिल्लोड तालुक्यात होता. त्यामुळे सिल्लोड सोबत आमचे नाते विसरता येणार नाही, त्यामुळे आपल्या राजकारणासाठी कोणी सिल्लोड ला बदनाम करण्याचे काम करीत असेल तर त्यांना सोडणार नाही अशा शब्दांत किशोर बलांडे यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - अर्जुन पा गाढे
सिल्लोड सोयगावच्या जनतेला वारंवार पाकिस्तानी म्हणणाऱ्या दानवेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी अर्जुन पा गाढे यांनी त्यांच्या भाषणात केली. रावसाहेब दानवे यांनी बेताल वक्तव्य व सिल्लोड तालुक्याची बदनामी थांबवा नसता रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील घरावर मोर्चा काढू असा इशारा अर्जुन पा गाढे यांनी दिला.
रावसाहेब दानवे यांनी या वक्तव्यावर माफी मागावी तसेच या बेताल वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होत असून दानवे यांना तडीपार करण्यात यावे , यानंतर ते अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करणार नाही यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी असे सुदर्शन अग्रवाल म्हणाले.
सिल्लोड सोयगाव तालुक्यातील जनतेला पाकिस्तानी म्हणणे हा तमाम जनतेचा अपमान करणे व पागलपणाचे लक्षण आहे असे मधुकर गवळी म्हणाले.
दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, श्रीरंग साळवे, राजूबाबा काळे, दामूअण्णा गव्हाणे, संदीप मानकर, रुपेश जैस्वाल, अकिल वसईकर, ऍड योगेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त करीत रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. तसेच रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली.
याप्रसंगी अर्जुन पा. गाढे, केशवराव पा. तायडे, श्रीराम महाजन , दारासिंग चव्हाण, रामदास पालोदकर, किशोर बलांडे , केतन काजे , बंडू पाटील शिंदे , देविदास लोखंडे, नंदकिशोर सहारे, भाऊराव लोखंडे, किशोर अग्रवाल अशोक सूर्यवंशी ,मारुती वराडे , डॉ. संजय जामकर, सुदर्शन अग्रवाल, नाना पा. कळम, राजेंद्र ठोंबरे, दिलीप जाधव , राजू बाबा काळे, जितसिंग करकोटक, मुरलीधरराव काळे, मधुकर गवळी, ऍड. योगेश पाटील, सतीश ताठे, विश्वास दाभाडे, राजू देशमुख, शेख सलीम, कौतिकराव मोरे, मनोज झंवर, गणेश गरुड ,अंकुश गाढवे, रमेश साळवे, पप्पू राऊत ,विजय आबा दौड , अनिस पठाण, पांडुरंग दुधे , सय्यद नासेर हुसेन,राहुल सपकाळ, प्रताप प्रसाद सुधाकर पाटील ,प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, राजू गौर, सत्तार हुसेन, नाना भवर ,रईस मुजावर ,आसिफ बागवान, सयाजी वाघ, बबलू पठाण, अमृत पटेल, विजय खाजेकर , हनिफ मुलतानी, नरसिंग चव्हाण ,विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे ,रमेश लाठी, जयराज चिंचपुरे, विशाल जाधव, गौरव सहारे ,निजाम पठाण , गोविंदराव भोजने , नासेर पठाण , मच्छिंद्र पालोदकर , प्रवीण मिरकर ,संतोष खैरणार, फहिम पठाण, राजेश्वर आरके, जितू आरके आदींसह सिल्लोड सोयगाव तालुक्यातील जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
What's Your Reaction?