कृषी पर्यटनाद्वारे द्या पर्यटकांना ग्रामीण जीवनाची अनुभूती - जी. श्रीकांत....
कृषी पर्यटनाद्वारे द्या पर्यटकांना ग्रामीण जीवनाची अनुभूती- जी. श्रीकांत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28 (डि-24 न्यूज)- कृषी पर्यटन ही पर्यटनाला नवीन आयाम देणारी संकल्पना असून मराठवाड्यातही तिला चांगला वाव आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शहरी भागातील लोकांना ग्रामीण जीवनाची अनुभूती देता येते, त्यासाठी अभिनव संकल्पना राबवाव्या असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.
महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक पर्यटन कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला करोडी येथील विसावा कृषी पर्यटन केंद्रात कृषी पर्यटन, आई योजना, पर्यटन योजना, होमस्टे आणि शाश्वत पर्यटन योजनांवर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत होते.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिनू, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जायस्वाल, मुख्य वक्ते महाराष्ट्र कृषी पर्यटन चे जनक पांडुरंग तावरे, मनोज हडोळे,पुरातत्व विभागाचे अरूण मलिक, डॉ.राजेश रगडे , डॉ.सुभाष जाधव,पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक विजय जाधव, एम टी डी सी च्या अंजली बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जी. श्रीकांत म्हणाले की, छत्रपती संभाजी नगरला कृषी पर्यटनाची राजधानी होण्यासाठी पुरेसा वाव आहे. आज शेती सोबत कृषी पर्यटन केंद्र चालवणे आवश्यक आहे. याठिकाणी आजच्या पिढीला ग्रामीण जीवनाची ओळख शहरी भागातील लोकांना करुन देता येईल असे त्यांनी सांगितले.
चंद्रशेखर जायस्वाल म्हणाले की, पर्यटन केंद्राच्या ठिकाणी डिजिटलचा वापर करणे महत्वाचा आहे. अनेक ठिकाणी कचऱ्यांचे ढीग दिसतात. जी वस्तू मातीत नष्ट होते अशा वस्तूंचा केंद्रामध्ये उपयोग करा असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी एम यांनी सांगितले की, अजिंठा, वेरूळ याठिकाणी जापनिज, मराठी अशा दोन प्रकारचे पर्यटक जास्त येतात. त्यांच्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. आपल्या शहराची खाद्यपदार्थाची ओळख असायला पाहिजेत असे सांगितले.
प्रास्ताविकात पर्यटन उपसंचालक विजय जाधव यांनी केले. या कार्यक्रमात नृत्य कलाकार कीर्ती बिरारे, आरती पाटणकर यांणी गणेश वंदना तर पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय आणि चंपावती महाविद्यालयातील युवा पर्यटन विभागाचे विद्यार्थी AI चा शेतीशी संबंधित उपयोग आणि प्लास्टिक कचरा करू नका या बाबत पथनाट्य केले.यावेळी कार्यशाळेसाठी जसवंत सिंग, वायटीजी, इलियास शेख,मराठवाडयातून शेतकरी , कृषी पर्यटन केंद्र चालक व पर्यटन मित्रांची , पर्यटन मार्गदर्शक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन करून डॉ .शिवाजी गायकवाड यांनी केले.
What's Your Reaction?