मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाच्या वतीने 25 मे रोजी आमखास मैदानावर भव्य कार्यक्रम...!

 0
मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाच्या वतीने 25 मे रोजी आमखास मैदानावर भव्य कार्यक्रम...!

मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाच्या वतीने 25 मे रोजी आमखास मैदानावर भव्य कार्यक्रम...!

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) केंद्र सरकारने वक्फ संशोधन कायदा मंजूर केला आहे. या कायद्याला देशभरातील मुस्लिम समाजाचा विरोध आहे. हा कायदा सरकारने रद्द करावा या मागणीसाठी देशभरात आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाच्या वतीने आंदोलन सुरु आहे. त्याचीच एक कडी म्हणून 25 मे रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत ऐतेहासिक आमखास मेदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. आज सायंकाळी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वक्फ संशोधन कायद्याचा निषेध करण्यासाठी व सरकारने हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी या कार्यक्रमात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाचे देशभरातील पदाधिकारी, विविध सामाजिक व धार्मिक संघटना, राजकीय नेते आपले मत मांडणार आहे अशी माहिती मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्डाचे सदस्य मौलाना महेफुजुर्रहमान यांनी दिली आहे. हजारोंचा जनसमुदाय या कार्यक्रमाला येणार आहे याची जनजागृती करण्यासाठी मोतीवाला फंक्शन हाॅल जवळ संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरात होल्डिंग्स लागणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow