दिव्यांगांनी केली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
दिव्यांगांनी केली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.4(डि-24 न्यूज) दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्था, काँग्रेस दिव्यांग सेलच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. विविध मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिव्यांगांबद्दल अपशब्द काढले म्हणून त्यांनी माफी मागावी व आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. रामगिरी महाराज व नितेश राणे यांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत तरीही त्यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नाही त्यांना अटक करावी हि मागणी यावेळी करण्यात आली. राज्यपालांना या मागणीचे निवेदन पाठवण्यात आले.
याप्रसंगी दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख नासेर, काँग्रेस दिव्यांग सेलचे शहराध्यक्ष मुदस्सर अन्सारी, कलीम खान, जकी मिर्झा बेग, शेख शाहरुख, नाजमिन बेगम, रवी सौदागर, नसीर खान, शेख इम्रान, लक्ष्मी घुले, मथुरा सपकाळ, मनिषा पवार, नजीर खान आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?