दिवाळी सुट्टी, नांदेड-हडपसर-नांदेड विशेष गाडीच्या 4 फे-या...
नांदेड-हडपसर-नांदेड विशेष गाडीच्या 4 फेऱ्या...
नांदेड, दि.18(डि-24 न्यूज)-
दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-हडपसर-नांदेड विशेष गाडी लातूर मार्गे चालविण्याचे ठरविले आहे. ते पुढील प्रमाणे
नांदेड- हडपसर विशेष गाडीच्या 02 फेऱ्या
गाडी क्रमांक 07607 हुजूर साहिब नांदेड ते हडपसर विशेष गाडी दिनांक 21 ऑक्टोबर, 2025 आणि 28 ऑक्टोबर 2025 मंगळवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी 08.30 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी शहर, कुर्डूवाडी, दौंड, मार्गे हडपसर येथे रात्री 21.40 वाजता पोहोचेल.
हडपसर - नांदेड विशेष गाडीच्या 02 फेऱ्या :
गाडी क्रमांक 07608 हडपसर ते हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी दिनांक 21 ऑक्टोबर, 2025 आणि 28 ऑक्टोबर 2025 मंगळवारी हडपसर रेल्वे स्थानकावरून रात्री 22.50 वाजता सुटेल आणि दौंड, लातूर, परळी, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12:15 वाजता पोहोचेल.
या गाडीत 22 डब्बे असतील.
असे जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?