इमराल्ड शैक्षणिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचे डोळ्यांची तपासणी शिबिर संपन्न
इमराल्ड शैक्षणिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचे डोळ्यांची तपासणी...
मोबाईल अती वापरामुळे दृष्टीवर होत आहे परिणाम
औरंगाबाद, दि.(प्रतिनिधी)
शहरातील नामांकित इमराल्ड शैक्षणिक व वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मराठवाडा काॅलेज ऑफ एज्युकेशन, We 4 You Group यांच्या सहकार्याने रहेबर शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या शेकडो विद्यार्थ्यांचे डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. हायटेक आय हॉस्पिटलचे डॉ.आसरा सालेहा यांनी डोळ्याची तपासणी करून काही विद्यार्थ्यांना नंबरचे चष्म्याचे लागण्याची शक्यता वर्तवली. मोबाईलच्या अतिवापर व डोळ्याची काळजी न घेत असल्याने काही विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आढळले. पालकांना सुध्दा त्यांनी आवाहन केले वेळोवेळी डोळ्यांची निगा राखावी व मोबाईल पासून लहान मुलांना दुर ठेवावे.
याप्रसंगी रहेबर शाळेचे संस्थापक अध्यक्ष मुस्तफा आलम खान, इमराल्ड शैक्षणिक संस्थेचे सय्यद अहेमद मोहीयोद्दीन, We 4 You Group चे अध्यक्ष सय्यद नाहिद, मराठवाडा काॅलेज ऑफ एज्युकेशनचे प्रो.कनिज फातेमा, वंचितचे मराठवाडा सचिव तय्यब जफर, शाळेच्या मुख्याध्यापिका खान तजिन फातेमा, ग्रुपचे सैफ खान, फराज शेख, अमान शेख, सय्यद नबील, सबा बानो शेख फराज, मारीया नुरीन मोहंमद इस्माईल आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?