ओवेसींच्या हस्ते कामगार भांड्यांचे संच वाटप कार्यक्रम, समीर साजिद बिल्डर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन

 0
ओवेसींच्या हस्ते कामगार भांड्यांचे संच वाटप कार्यक्रम, समीर साजिद बिल्डर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन

असदोद्दीन ओवेसी यांच्या हस्ते बांधकाम कामगार संच भांडे वितरित...

समीर साजिद बिल्डर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)

 दारूस्सलाम येथे झालेल्या कार्यक्रमात पांचशेचा वर कामगारांना कामगार संच भांडे वितरित करण्यात आलेले आहे.

औरंगाबाद- ऑल इंडिया मजलीस- ए - इत्त्तेहादुल मुस्लिमीन औरंगाबाद तर्फे मुख्य कार्यालय दारूस्सलाम येथून बांधकाम कामगारांना भांडे संचाचा चौथा टप्पा ऑल इंडिया मजलीस- ए - इत्त्तेहादुल मुस्लिमीनचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी यांच्या हस्ते आज वितरीत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर गफार कादरी, धुळेचे आमदार फारुख शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर यांच्या वतीने करण्यात आले होते. समीर साजिद बिल्डर यांनी सांगितले आहे की,मागील एक वर्षांमध्ये तीन हजार च्या जवळपास कामगारांची नोंदणी करण्यात आली होती. आता पर्यंत एक हजार आठशे कामगार संच भांडे वितरित करण्यात आले आहे. या ठिकाणी कामगार नोंदणी करण्यात आली होती. त्या नोंदणीकृत कामगारांचे केवायसी करून त्यांना भांडे वाटपाची कार्यक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमात यशस्वी त्यासाठी कामगार अध्यक्ष काकासाहेब काकडे, युवा जिल्हा अध्यक्ष मुन्शी भैय्या पटेल, युवा जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान, महिला शहर कार्य अध्यक्ष अंकिता ताई गजहंस, नसीर खान, कलीम खान मूनलाईट,आदींनी मेहनत घेतली याप्रसंगी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow