हर्षवर्धन जाधव मैदान सोडायला तयार नाही, महायुती व महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार...?

 0
हर्षवर्धन जाधव मैदान सोडायला तयार नाही, महायुती व महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार...?

हर्षवर्धन जाधव मैदान सोडायला तयार नाही, महायुती व महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार...?

हर्षवर्धन जाधव यांना शिंदे गटाची उमेदवारी द्यावी याची चाचपणी सुध्दा करण्यात आली काय निर्णय होतो बघावे लागेल...

औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव मैदान सोडायला तयार नाही ते आज निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून सल्ला दिला लोकसभेचा नाद सोडा विधानसभेकडे लक्ष द्या तरीही हर्षवर्धन जाधव मैदान सोडायला तयार नाही. दोनशे टक्के निवडणूक लढणार जनतेची साथ हवी असे आवाहन एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी केले आहे. जाधव हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असे स्पष्ट दिसत आहे. यामुळे महायुती व महाविकास आघाडीचे गणित बिघडेल. कौटुंबिक कलह दुर व्हावे यासाठी घटस्फोटाची पेटीशन मागे घेतली. काही चुका दोन्हीकडून झाले असतील. मध्यम मार्ग काढून प्रकरण मिटवूया पण दिड दोन महीने झाले तरी प्रतिसाद नाही. घरगुती अत्याचाराचा गुन्हा सिद्ध करून दहा लाखांची रिकव्हरी काढली. तरीही मला दाबायचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी फोन केला म्हणजे त्यांचा बोलवता धनी कोण हे मला कळाले. संजना दानवेंची शिंदे गटाकडून कन्नड विधानसभेची उमेदवारी निश्चित झाली आहे तरीही मला लोकसभेसाठी रोखायचा प्रयत्न केला जात आहे. असे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हर्षवर्धन जाधव बोलत आहे.

महाविकास आघाडीतून चंद्रकांत खैरे, महायुतीकडून विनोद पाटील यांचे नाव निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. एमआयएम कडून पुन्हा इम्तियाज जलील, वंचित कडून अफसरखान हे उमेदवार निश्चित झाले आहे. अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव व डॉ.जीवन राजपूत उमेदवारी अर्ज भरु शकतात.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow