आदर्श घोटाळा प्रकरण, तपास यंत्रणेवर खा.इम्तियाज जलिल यांनी ओढले ताशेरे

 0
आदर्श घोटाळा प्रकरण, तपास यंत्रणेवर खा.इम्तियाज जलिल यांनी ओढले ताशेरे

आदर्श घोटाळा प्रकरण, तपास यंत्रणेवर खासदार इम्तियाज जलिल यांनी ओढले ताशेरे

आदर्श घोटाळ्याची कागदपत्रे घेऊन केले थाळी वाजवा आंदोलन

मंत्रीमंडळ बैठकीवर दिला आंदोलनाचा इशारा

औरंगाबाद, दि.28 (डि-24 न्यूज) उपनिबंधक कार्यालयासमोर आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेविदार संघर्ष कृती समितीच्या वतीने थाळी बजाओ आंदोलन आयोजित करण्यात आले होते. गरीबांचे पैसे पतसंस्थेच्या माध्यमातून परत मिळावे यासाठी खासदार इम्तियाज जलिल मागिल दोन महिन्यापासून आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. तीन ऑडीटरला जामिन मिळाल्याने तपास यंत्रणेंवर खासदार इम्तियाज जलिल चांगलेच संतापले आहेत. आपल्या भाषणात त्यांनी पोलिस आयुक्त यांनी बणवलेली तपास समितीवरच संशय असल्याचे बोलले. दोन दिवसात डिआयजी यांची मुंबईत भेट घेऊन या घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लेखापरीक्षण अहवालात काय दडलय, घोटाळा झाला तरीही तक्रार करण्यास कसा विलंब लागला, पतसंस्थेच्या 28 शाखा कशा अनधिकृत पणे जिल्ह्यात सुरू होते. आदर्शचे चेअरमन मानकापे व त्यांच्या नातेवाईकांनी कसा मलिदा खाल्ला याबाबत त्यांनी टिका केली. शेकडो कोटींचा घोटाळा झाला पुरावे देऊनही न्यायालयात दिले जात नसल्याने तपास अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले.

याप्रसंगी शेकडो पेजेसचे आदर्श घोटाळ्याची कागदपत्रे आणून भांडाफोड केला. पतसंस्थेचे चेअरमन व संचालक यांनी कशा प्रकारे विनातारण कोट्यावधींची कर्ज घेतले व ठेवीदारांची फसवणूक केली त्याची यादीच त्यांनी वाचून दाखवली. नारेगाव येथील शहा यांना कोट्यावधींचे कर्ज मिळाले. घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी तो शहा आणि एक फोटोग्राफर कशा प्रकारे प्रकरण चिघळण्यासाठी आरोपिंची मदत करत आहे याचा जलिल यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला. शहरात मंत्र्यांचे दौरे होत आहे पण एकही मंत्री ठेवीदारांच्या समस्या ऐकूण घेण्यास पुढाकार घेत नसल्याचा आरोप लावला. निवडणुका आल्या की आपला वापर केला जातो नंतर हे लोक विसरतात. आपल्या अडचणी सोडविण्यासाठी कोणी समोर येत नाही. ठेविदारांना त्यांनी आश्वासन दिले आपण घाबरु नका एक एक पैसा वसूल करण्यासाठी आपल्याला घरी बसून चालणार नाही तर पोलिस व सरकारवर दबाव वाढवावा लागेल तरच पैसे परत मिळतील. 16 सप्टेंबर रोजी शहरात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे त्यासाठी ठेवीदारांनी सज्ज राहण्यास खासदार इम्तियाज जलिल यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी ठेवीदारांचे पैशांची हमी घ्यावी अशी मागणी सुध्दा त्यांनी केली आहे. थाळी वाजवा आंदोलनात ठेवीदारांनी थाळी वाजवून परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. थाळी वाजवा आंदोलनानंतर मोर्चा पोलिस आयुक्त कार्यालयाकडे वळला. पोलिस अधिकारी यांनी तपासाबाबत खासदारांना सविस्तर माहिती दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow