शिक्षातज्ञ मधुकर अण्णा मुळे यांचे निधन...! शिक्षा व उद्योग क्षेत्रात शोककळा

शिक्षातज्ञ मधुकर अण्णा मुळे यांचे निधन...! शिक्षा व उद्योग क्षेत्रात शोककळा
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी महासचिव, शिक्षातज्ञ, जेष्ठ उद्योजक मधुकर अण्णा हरिभाऊ मुळे(वय 88) यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. सायंकाळी बनेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
मधुकर अण्णा मुळे हे व्यवसायासाठी शहरात आले होते. सन 1956 मध्ये त्यांनी शालेय साहित्य मंदिर नावाने पुस्तक व स्टेशनरीचा व्यवसाय सुरू केला होता. सन 1958 मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष बनले. सन 1962 मध्ये सरस्वती भुवन शैक्षणिक सोसायटीचे आजीवन सदस्य बनले. त्या समितीमध्ये त्यांनी काम केले. त्यांनी मुळे ब्रदर्स नावाने कंपनी स्थापन केली. आपल्या दोन भावंडासह बांधकाम व्यवसायाकडे वळले. देशभरात त्यांनी विविध योजनांची कामे केली. मधुकर अण्णा मुळे यांची सन 1988 मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या महासचिव पदी निवड झाली. 25 वर्ष त्यांनी या पदावर काम करत असताना मशिप्रामचा विस्तार केला. यामध्ये नामांकित देवगिरी महाविद्यालयात सह 11 महाविद्यालय, 30 ज्युनिअर कॉलेज व उच्च माध्यमिक विद्यालय, दोन विधी महाविद्यालय, एक फाॅर्मसी, 51 माध्यमिक विद्यालय, 3 प्राथमिक, 2 स्थायी विना अनुदानित काॅलेज आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचा विस्तार शंभर हुन अधिक शाखांमध्ये झाला. शैक्षणिक व उद्योग क्षेत्रात काम करत असताना त्यांचा राजकीय क्षेत्रात पण दबदबा होता. औरंगाबाद पश्चिम विधानसभा निवडणुकीत भाग्य आजमावले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. बांधकाम क्षेत्रात, वीज, साखर उद्योग, ऑटोमोबाईल सारख्या विविध क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात 77 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी आयोजन केले होते. त्याकाळी त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून भुमिका साकारली होती. मराठवाडा साहित्य परिषद मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांनी काम पाहिले होते. मसापच्या विकासात त्यांनी योगदान दिले. सन 1999 मध्ये गठीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक लढली. त्यांनी शिक्षा, उद्योग, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कृषी क्षेत्रात ओळख निर्माण केली. मधुकर अण्णा मुळे यांच्या पश्चात पत्नी, पुत्र उद्योजक सचिन व अजित मुळे, भाऊ उद्योजक शरदराव, सुधाकरराव, पद्माकरराव मुळे यांच्या सह सुना, नातीपोती असा मोठा परिवार आहे.
What's Your Reaction?






