"हाॅस्पिटल से जेलतक" आपबिती पुस्तकाचे लेखक डॉ.कफिल खान शहरात, विविध ठिकाणी सत्कार
रीड आणि लीड फाउंडेशनच्या "मीट द ऑथर" या कार्यक्रमात डॉ. कफील खान यांच्या 'द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी' या पुस्तकावर चर्चा
देशातील तरुणांना प्रतिकूल परिस्थितीत धैर्य दाखवून परिस्थितीला सामोरे जाण्याचा सल्ला दिला...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) 1 डिसेंबर - कैसर कॉलनी येथील फाउंडेशनच्या कार्यालयात रीड अँड लीड फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने "मीट द ऑथर" कार्यक्रमात गोरखपूर येथील डॉ. कफील खान यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ.कफील खान यांच्या 'द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी' या पुस्तकावर चर्चा झाली. डॉ. कफील खान यांनी सांगितले की 10 ऑगस्ट 2017 रोजी गोरखपूर बाबा राघव दास मेडिकल कॉलेज, उत्तर प्रदेशमध्ये 80 हून अधिक रुग्ण, 63 मुले आणि 18 प्रौढांना प्राण गमवावे लागले होते. अथक प्रयत्न केल्याने शेकडो मुलांचे प्राण वाचले. या महान कार्यासाठी देशाने त्यांना मसिहा आणि हिरो घोषित केले, परंतु काही दिवसांनी त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवून तुरुंगात टाकण्यात आले आणि त्यांच्या आधारे अमानुष अन्याय आणि अत्याचाराची परिसीमा ओलांडली गेली 'द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी, हिंदी अनुवाद 'हॉस्पिटल से जेल तक' आणि मराठी अनुवाद 'अनेक मृत्यु, एक बली' या पुस्तकावर कार्यक्रमात चर्चा झाली.
पीडित मुलांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्तरावर प्राणवायू देण्याचा प्रयत्न केला आणि या सेवेसाठी त्यांना अनेक अत्याचारांना सामोरे जावे लागले, त्यांना अटक झाली आणि थोडक्यात त्यांनी लिहिलेल्या तुरुंगवासातील कटू वास्तवांवर या पुस्तकाने प्रकाश टाकला. अशा घटना घडत आल्या आहेत आणि भविष्यातही गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे, मात्र अशा प्रसंगांनी घाबरून निराश होण्याची गरज नाही, असे डॉ.कफील यांनी यावेळी स्पष्ट केले होते. उलट अशा प्रकारे देशाची लोकशाही आणि संविधान बळकट होते. प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य बाळगून लढा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला. डॉ.कफील यांनी पालकांना चांगल्या आणि उच्च शिक्षणासोबतच आपल्या पाल्यांचे धार्मिक दृष्ट्याही मानसिक प्रशिक्षण द्यावे, असा संदेश दिला.
सत्य आणि न्यायाचे पालन करण्याबरोबरच, त्यांना हलाल आणि हराममध्ये फरक करण्यास शिकवा. डॉ. कफील यांनी सांगितले की, त्यांच्या 'अस्पताल से जेल तक' या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. वाचकांना हे पुस्तक खूप आवडले आहे. प्रारंभी रीड ॲण्ड लीड फाऊंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी फाऊंडेशनच्या कार्याची व उद्दिष्टाविषयी माहिती देताना सांगितले की, कोणताही लेखक, पत्रकार किंवा विचारवंत शहरात आल्यावर त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात येते आणि "लेखक "मीट" कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी कॉम्रेड एड अभय टाकसाळ, काझी मोहिउद्दीन, सलीम अहमद, प्रा.गनी पटेल, झिया सर, याहिया खान, अझरुद्दीन, डॉ.अशफाक अहमद इक्बाल, मिर्झा हारुन बेग आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?