पडेगावात तणाव निर्माण करणा-या दोन्ही गटातील आरोपींना 26 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

पडेगावात तणाव निर्माण करणा-या दोन्ही गटातील आरोपींना 26 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी
औरंगाबाद,दि.23(डि-24 न्यूज) 22 जानेवारीला लहान मुलांमधील भांडणाचा वाद वाढल्याने पडेगाव येथील कासंबरी दर्गा परिसरातील एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरणी छावणी पोलीसांनी दोन्ही गटातील 64 आरोपींना अटक केली होती. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने 26 जानेवारीपर्यंत दोन्ही गटातील आरोपींना पीसीआर (पोलीस कस्टडी रिमांड) दिला अशी माहिती निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.
एका गटाकडून एड जिशान जैदी, एड खान सलिम खान, एड आदिल बियाबानी, एड परवेझ खान, एड खिजर पटेल, एड साजिद बागवान यांनी न्यायालयासमोर जामिनासाठी युक्तिवाद केला परंतु न्यायालयाने तीन दिवसांचा पिसिआर दिला. आरोपींच्या जामिनासाठी माजी नगरसेवक अफसरखान, एमआयएमचे माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, हाजी इसाक खान, अबुल हसन व कार्यकर्त्यांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती.
पडेगाव येथील संजय पार्क मधील मोहम्मद जीशान नजर मोहम्मद यांच्या तक्रारीवरून 27 लोकांसह शंभर ते दीडशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ केली, इनको जिंदा नही छोडेंगे म्हणत रॉड, काठी, लाठीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
तर शेख आरेफ शेख उस्मान (वय 43, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव, औरंगाबाद) यांच्या फिर्यादीवरून 40 ते 50 खादियानी समाजाच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रस्त्याने जाण्या येण्याच्या कारणावरून आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
What's Your Reaction?






