भाकपाच्या औरंगाबाद मध्यच्या निवडणूक तयारी मेळाव्यास प्रतिसाद, एड अभय टाकसाळ लढणार निवडणूक
भाकपच्या औरंगाबाद मध्यच्या निवडणूक तयारी मेळाव्यास प्रतिसाद ! डॉ . कांगोंना आघाडीचे चर्चेसाठी निमंत्रण !
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि 21(डि-24 न्यूज) भारतीय कम्यूनिस्ट पक्ष , डावे पक्ष , प्रागतिक व आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने विधानसभा मध्य मतदार संघातील उमेदवार ॲड . अभय मनोहर टाकसाळ प्रचाराच्या तयारीसाठीचा मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
औरंगाबाद मध्य सह राज्यात 11 जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे . या 11 जागांवर भाकपची तयारी असल्याने या तयारीचा आढावा घेण्यासाठीचे मेळावे होत आहेत. याचाच भाग म्हणून गांधी भवन सिल्लेखाना रोड औरंगाबाद येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात भाकपचे राष्ट्रीय सचिव डॉ भालचंद्र कांगो यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. भारतीय कम्यूनिस्ट पक्ष हा भाजपा च्या विरोधात प्रखरपणे भूमिका घेणारा पक्ष आहे , विधानसभा निवडणूकीत कमीत कमी जागी निवडणूक लढवण्याचे आमचे धोरण आहे आम्ही महाविकास आघाडीचा लोकसभेत जोरदार प्रचार केला आम्ही हात पूढ केला आहे त्यांनी टाळी द्यावी , महाविकास आघाडीच्या तिनही प्रमुख पक्षांनी कीमान एक एक जागा भाकपला सोडावी, जनता त्रस्त आहे भाजपाकडून जनतेची सुटका करण्यासाठी एकजूटीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ . भालचंद्र कांगो यांनी केले. उपस्थित कार्यकर्त्यांना कॉ राम बाहेती यांनीही मार्गदर्शन केले. औरंगाबाद मध्य मतदार संघातील मतदार जातीयवादाला कंटाळला असून समस्यांपासून मुक्तीची वाट पाहतो आहे , मुस्लीम शत्रु दाखवून हिंदूसह सर्व धर्मियांना लुटणाऱ्या भाजपा हटवणे आवश्यक आहे. मतदार संघाचा विकास थांबला आहे , विश्वासाने निवडून दिले तर विश्वासघात करणार नाही असे मनोगत ॲड . अभय मनोहर टाकसाळ यांनी व्यक्त केले. यावेळी स्वराज अभियानचे साथी सुभाष लोमटे , समाजवादी पक्षाचे वसीम खान सिकंदर खान , दलीत पँथरचे रमेशभाई खंडागळे , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ भगवान भोजने , अमजद खान यांनी शुभेच्छा संदेश दिले.
या मेळाव्यात भाकपचे फुलंब्री तालूका सेक्रेटरी कॉ अशोक जाधव , सिल्लोड तालूका सेक्रेटरी कॉ सय्यद अनिस यांच्यासह शहर सहसचिव कॉ . अनिता हिवराळे , कॉ जॅक्सन फर्नांडीस , कॉ विकास गायकवाड , अतिश दांडगे , अभिजीत बनसोडे , चंद्रकला नावकर , संदीप पेढे , इंदूमती केवट , वैशाली मकासरे , शिला साठे , कॉ योगेश खोसरे , लोकेश कांबळे , मनजीत गायकवाड , अँड. अय्याज शेख , ॲड आनंद कांबळे , कॉ रफीक बक्श , शेख एजाज , सुभाष गायकवाड , शिलाबाई दिवे , कॉ मनिषा भोळे , विशाल बोराडे , यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
प्रास्ताविक जिल्हा सेक्रेटरी कॉ अश्फाक सलामी तर आभार प्रदर्शन कॉ भास्कर लहाने तर कॉ मधूकर खिल्लारे यांनी संचलन केले .
यावेळी प्रमुख उपस्थिती दत्ता नागरे , शेख अमजद शेख पाशु,
शेख अकील, शेख गुलाम रसूल, शेख परवेझ, शेख वजीर यांची होती.
What's Your Reaction?