कोडीन सिरपच्या नशेची विक्री करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड...!
कोडीन सिरपच्या नशेची विक्री करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)- शहर नशा मुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त प्रविण पवार सतत पथकाद्वारे कार्यवाई करत अवैध नशा विक्री करणाऱ्या आरोपिंची लिंक तोडत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकांकडून शहरात सुरू असलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. कोडीन सिरपचा नशेसाठी पुरवठा करणाऱ्या बाहेर राज्यातील टोळीचा 15 नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला होता. मध्य प्रदेश, गुजरात, धुळे व छत्रपती संभाजीनगर येथील चार आरोपिंकडून 18,360 कोडिंग सिरप बाॅटल एकूण 77 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. आज सायंकाळी यातील आरोपी कल्पेश अग्रवाल, सय्यद नबी सय्यद लाल यांनी रोशन गेट व कटकट गेट परिसरात तपास काही अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख तथा पोलिस निरीक्षक श्रीमती गिता बागवडे यांनी धिंड काढली व जनतेमध्ये जागृती करत कोठे अंमली पदार्थांची विक्री होत असेल तर थेट पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन केले. शहरातील लोकांनी संपर्क करुन माहिती दिल्यानंतर अवैध नशा विक्री करणाऱ्या विरोधात कडक कारवाई केली जात आहे. माहिती देणा-यांचे नाव गुप्त ठेवले जात आहे. पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर नशा मुक्त करण्यासाठी वाटचाल सुरू आहे यासाठी जनतेचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तपास अधिकारी सपोनि रविकांत गच्चे व टिम उपस्थित होती.
What's Your Reaction?