सुर्यवंशी प्रकरण, न्यायालयाच्या अधिपत्याखाली एसआयटी नेमावी - एक प्रकाश आंबेडकर

 0
सुर्यवंशी प्रकरण, न्यायालयाच्या अधिपत्याखाली एसआयटी नेमावी - एक प्रकाश आंबेडकर

सुर्यवंशी प्रकरण, न्यायालयाच्या अधिपत्याखाली एसआयटी नेमावी - एक प्रकाश आंबेडकर

राज्य सरकारला नोटीस, पुढील सुनावणी 29 एप्रिलला, आंबेडकरांनी केला न्यायालयासमोर युक्तिवाद...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सुर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी बाॅम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात एड प्रकाश आंबेडकर यांनी याचिका दाखल केली आहे. आज झालेल्या सुनावणीत स्वतः आंबेडकर यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या अधिपत्याखाली चौकशीसाठी एसआयटी नेमावी अशी विनंती केली आहे. या प्रकरणात राज्य सरकार आरोपी आहे मग ते या प्रकरणी तपास कसा काय करु शकता. असा कळीचा प्रश्न आंबेडकरांनी बाॅम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात उपस्थित केला. सोमनाथ सुर्यवंशीच्या मातोश्री विजयाबाई सुर्यवंशी यांनी याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सुनावणी झाली असता न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली आहे. न्यायालयात वार्तालाप करताना आंबेडकर यांनी शहीद सोमनाथ सुर्यवंशी असा उल्लेख केला. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यावर मॅजिस्ट्रेटने चौकशी केल्यानंतर पुढे काय...? याविषयी कायदा अपूर्ण आहे यामुळे न्यायालयाने नियमावली तयार करावी. अशी मागणी न्यायालयाकडे केली. विशेषतः या प्रकरणी आम्ही एसआयटी नेमन्याची विनंती केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow