डॉ.सोनम वांगचुंग यांची बिनशर्त सुटकेच्या मागणीसाठी केली निदर्शने...

 0
डॉ.सोनम वांगचुंग यांची बिनशर्त सुटकेच्या मागणीसाठी केली निदर्शने...

डॉ. सोनम वांगचुक यांची बिनशर्त सुटका करा म्हणून विभागीय आयुक्तालयावर निदर्शने..!!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- जेष्ठ गांधीवादी - पर्यावरणवादी डॉ. सोनम वांगचुक यांची तात्काळ बिनशर्त सुटका करावी म्हणून आज विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आल्याचे पत्रक, संविधान बचाव देश बचाव अभियान वतीनेचे वतीने प्रसिद्धीस दिले आहे.

लडाख प्रदेशास राज्यघटनेच्या 6 व्या परिशिष्टात घालावे, या भागातील तरुणांना नोकऱ्यांचे सर्व मार्ग प्रशस्त करावेत, इ. मागण्यासाठी डॉ.सोनम वांगचुक अनेक वर्षांपासून शांततेच्या मार्गाने लढा देत आहेत. या मागणीचे पाठीशी , राज्यातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने एकवटलेला आहे.

सरकारने लडाख प्रदेशाचे विकासासाठी दिलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी करणे गुन्हा आहे काय..? असा प्रश्न सर्वत्र विचारला जात असल्याने, केंद्र सरकार खूप अस्वस्थ झाले आहे.

शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनास हिंसेचे गालबोट लावले गेले. या हिंसाचाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी स्वतः डॉ. सोनम यांनी केली असतांना, त्यांनाच हिंसा केली म्हणून देशद्रोहाचे गुन्ह्याखाली अटक करून, जोधपूरचे कारागृहात डांबून ठेवणे, हे कोणत्या राजवटीच्या नैतिकतेत बसते,. असा सवाल आज झालेल्या निदर्शनांच्या वेळी अनेक वक्त्यांनी केंद्र सरकारला केला.

विभागीय आयुक्त कार्यालयावर झालेल्या निदर्शनांच्या वेळी, निर्दोष डॉ. सोनम वांगचुक यांची विनाविलंब व बिनशर्त सुटका करा , लडाखचा समावेश संविधानाच्या 6 व्या परिशिष्टात करावा, 5 वर्षापासून खोट्या आरोपाखाली दिल्लीच्या तिहार जेल मध्ये डांबलेल्या उमर खालिद याची त्वरीत सुटका करा , इ मागण्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस व जय किसान आंदोलन - स्वराज अभियानचे साथी सुभाष लोमटे, जेष्ठ अर्थशास्त्री प्रा. एच. एम. देसरडा, दलीत पँथर्सचे रमेशभाई खंडागळे, राष्ट्र सेवादलाचे प्रा.सुभाष महेर, भारत जोडो अभियानचे प्रा.गीता कोल्हटकर, संविधानवादी अनंत भवरे, कॉ. मधुकर खिल्लारे, स्वराज अभियानचे साथी शेख खुर्रम, इ. ची यावेळी भाषण झाली.

डॉ. सोनम वांगचुक यांची विनाविलंब सुटका करावी या प्रमुख मागणीचे निवेदन, मा. विभागीय आयुक्तांचे मार्फत, महामहीम राष्ट्रपती यांना देण्यात आले , त्या शिष्टमंडळात प्रा. सुभाष महेर, रमेशभाई खंडागळे, प्रा . श्रीराम जाधव, प्रा. गीता कोल्हटकर, साथी देविदास किर्तीशाही, साथी भाऊसाहेब पठाडे, यांचा समावेश होता.

आज झालेल्या निदर्शनात, संविधान बचाव देश बचाव अभियान चे प्रा. मच्छिंद्र गोरडे, इंद्रकुमार जेवरीकर , साथी अण्णा खंडारे, साथी सुलभा खंदारे, प्रा . प्रकाश शिरसाट, डॉ.जनार्दन पिंपळे,मराठवाडा लेबर युनियन चे साथी छगन गवळी, साथी प्रवीण सरकटे, साथी सर्जेराव जाधव,राष्ट्र सेवादलाचे प्रा. प्रकाश दाणे , वंचित बहुजन आघाडीचे प्रा.भारत शिरसाट, ज्ञानेश्वर सोनूने , मनिषा बल्लाळ, कॉ.विकास गायकवाड, अरुण मते , भीमराव गाडेकर इ. चा ही प्रमुख सहभाग होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow