राजेंद्र वाघमारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार...!

 0
राजेंद्र वाघमारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार...!

राजेंद्र वाघमारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार...

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज ) शिक्षक फाउंडेशन द्वारा संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्या संयोगाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान सोहळा नाशिक या ठिकाणी दिनांक 24 मे 2024 रोजी प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून एक शिक्षकाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातून राजेंद्र वाघमारे उच्च श्रेणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांबर्डा यांना देण्यात आला. राजेंद्र वाघमारे 38 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम असून यांच्या हातून अनेक विद्यार्थी देशपातळीवर आज काम करत आहे या त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या निवड समितीने त्यांना हा पुरस्कार दिला. त्यांनी 24 मे रोजी नाशिक गुरुदक्षिणा हॉलमध्ये हा सन्मान स्वीकारला या सन्मान सोहळ्याला शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा संपर्कप्रमुख कडूबा साळवे, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश चव्हाण, सोयगाव तालुका अध्यक्ष गजानन वरकड, छत्रपती संभाजी नगर तालुका कोषाध्यक्ष विलास बापू चव्हाण व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow