छावणीत एका घराला अचानक आग लागल्याने कुटुंबातील 7 जणांचा दुर्देवी मृत्यू

छावणीत एका घराला अचानक आग लागल्याने कुटुंबातील सात जणांचा दुर्देवी मृत्यू
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) छावणी कॅन्टोन्मेंट परिसरातील जैन मंदीराजवळ अचानक एका तीन मजली इमारतीला आग लागल्याने कुटुंबातील सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यापैकी एक लापता असल्याचे कळत आहे. खाली कापड दुकान आहे. रात्री तीन वाजेदरम्यान आगीची हि घटना घडल्याचे कळाले आहे. घटनास्थळी बचाव कार्यासाठी कॅन्टोन्मेंट अधिकारी, कर्मचारी व छावणी पोलिस आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्यासाठी सरसावले. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे कळाले यामध्ये दोन बालक, तीन महीला व एक माणूस व एक लापता असल्याचे कळत आहे. पोलिसांनी आतापर्यंत या घटनेबद्दल अधिकृत माहिती दिली नाही काही वेळात माहिती मिळताच डि-24 न्यूज दुसऱ्या बातमीत देईल. आग कशामुळे लागली हे पण पोलिस तपासात समोर येईल. शव घाटी रुग्णालयात एम्बूलन्सने पाठवण्यात आले आहे. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही वेळात अधिक माहिती दुस-या बातमीत देण्यात येईल. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. शहरात शोककळा पसरली आहे.
What's Your Reaction?






