फिरदौस फातेमा एमआयएम महिला विंगच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड
फिरदौस फातेमा एमआयएम महिला विंगच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) रहेमानिया काॅलनी वार्डातील माजी नगरसेविका श्रीमती फिरदौस फातेमा रमजानी खान यांची एमआयएमच्या महिला विंगच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. आज त्यांना खासदार इम्तियाज जलील यांनी नियुक्तीचे पत्र दिले.
प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी हि नियुक्ती केली आहे. फिरदौस फातेमा ह्या उच्चशिक्षित महिला तथा सामाजिक कार्यात नेहमी पुढे असतात. त्या चांगल्या वक्त्या पण आहेत. या नियुक्तीमुळे आगामी निवडणुकीत एमआयएमला फायदा होईल असे बोलले जात आहे.
नियुक्तीनंतर प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी, जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, यासेर अराफत फारुकी, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?