औरंगाबाद शहरात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, काँग्रेस नेते युनुस पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त

 0
औरंगाबाद शहरात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, काँग्रेस नेते युनुस पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त

औरंगाबाद शहरात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, काँग्रेस नेते युनुस पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) 1 जानेवारी 2024 रोजी शहरात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचे आगमन झाले. त्याला पाहण्यासाठी व सेल्फी घेण्यासाठी हर्सुल येथे युवकांची गर्दी पाहायला मिळाली. हडको काॅर्नर ते हर्सुलपर्यंत चारचाकी वाहनांचा ताफा आणि एका गाडीत सिकंदर शेख व हर्सुलचे पहेलवान मुख्तार पटेल यांना सुरक्षा रक्षकांचे कवच. गाडीवर फुलांचा वर्षाव व फटाक्यांची आतिषबाजी सिकंदरच्या स्वागतासाठी करण्यात आली.

निमित्त होते हर्सुलचे काँग्रेसचे नेते युनुस पटेल यांच्या वाढदिवस कार्यक्रमाचे. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गरजूंना वाढदिवसानिमित्त एक हजार कंबल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल व सिकंदर शेख यांचा भव्य सत्कार युनुस पटेल मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेविका मसरत युनुस पटेल यांची उपस्थिती होती.

व्यासपीठावर काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, शहराध्यक्ष युसुफ शेख, एमआयएमचे मा.नगरसेवक नासेर सिद्दीकी, आरेफ हुसेनी, या.नगरसेवक रुपचंद वाघमारे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अयुब पटेल, हाजी रशिद पटेल, फारुख पटेल, जावेद पटेल आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सिकंदर शेख याला दोन लाखांचे इनाम व हर्सुलची कन्या साक्षीने खेळात प्राविण्य मिळवले असल्याने साक्षीला 11 हजार रुपये बक्षीस देण्यात आले. दोन्ही खेळाडूंचा टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी स्वागत केले.

याप्रसंगी युनुस पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध पक्ष संघटनांचे नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आज दोन जानेवारीला एक हजार गरजूंना कंबलचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे युनुस पटेल मित्रमंडळाच्या वतीने व नियोजन समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow