महापालिका निवडणूक, काँग्रेसकडून 285 इच्छूकांनी भरले अर्ज...
महानगरपालिका लढवण्यासाठी काँग्रेसला इच्छुक उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद. 8 दिवसात एकुण 285 अर्ज जमा....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) -महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवारांचे अर्ज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहर जिल्हाध्यक्ष अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली 12 ते 20 नोव्हेंबर दरम्यान जमा करण्यात आले. इच्छुक उमेदवारांचा अर्ज वाटपाला उत्साहपूर्ण व मोठा प्रतिसाद मिळाला.
शहरातील विविध प्रभागांमधून समाजाच्या सर्व स्तरातील इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने पक्ष कार्यालय, गांधी भवन येथे भेट देत अर्ज मिळवण्यासाठी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. सर्व जाती धर्माच्या एकोप्याने राहून शहराच्या विकासासाठी या ऐतिहासिक शहरातून भाजप, एमआयएम सारखे जातीयवादी व बी टीम पक्षांना संपविण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पुन्हा काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहेत, येणाऱ्या निवडणुकीनंतर महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता येईल व विकासाचे राजकारण केले जाईल, असे मत शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी व्यक्त केले.
काँग्रेस पक्षावर लोकांचा वाढता विश्वास, शहराच्या विकासाबद्दल लोकांमध्ये जागृती, युवक, महिला, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची सक्रियता व लोकशाही प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांचा वाढता सहभाग आहे, यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज जमा होत आहेत असे या उत्स्फूर्त सहभागातून स्पष्ट होते आहे असे आशावाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाने घेतलेल्या विकासाभिमुख भूमिकेमुळे आणि सामान्य नागरिकांसाठीच्या सतत लढ्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत असे अनेक इच्छुक उमेदवारांनी सांगितले अर्ज भरताना सांगितले. काँग्रेस पक्षाकडूनही पारदर्शक, लोकाभिमुख आणि कार्यक्षम नेतृत्व पुढे आणण्याचा दृढ निश्चय केला आहे. छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांच्या पाठिंब्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष अधिक सक्षम आणि बळकट पणे उभा राहील. म्हणून तब्बल 285 पेक्षा जास्त अर्ज एवढे कमी वेळेत प्राप्त झाले आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावर इच्छुक पक्ष कार्यालय गांधी भवन, शहागंज येथे भेट देऊन अर्ज नेऊन भरून देत आहेत.
What's Your Reaction?