नांदेडची जनता धोकेबाजांना ओळखून संविधानवाद्यांच्या बाजूने उभी राहिल- वंचितचे प्रवक्ते फारुख अहमद

 0
नांदेडची जनता धोकेबाजांना ओळखून संविधानवाद्यांच्या बाजूने उभी राहिल- वंचितचे प्रवक्ते फारुख अहमद

नांदेडची जनता धोकेबाजांना ओळखून संविधानवाद्यांच्या बाजूने उभी राहील- फारूक अहमद 

नांदेड,दि.13(डि-24 न्यूज)

सध्या महाराष्ट्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलेले आहे. यापूर्वी अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण आणि भास्करराव खतगावकर यांना प्रत्येक निवडणुकीत नांदेडच्या जनतेने भक्कमपणे साथ दिलेली आहे परंतु या तिघांनीही आळीपाळीने मतदारांचा विश्वासघात करत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मस्का काँग्रेस पक्ष काढून शंकरराव चव्हाण यांनी धोका दिला, 2019 ला भाजपमध्ये जाऊन खतगावकरांनी धोका दिला तर आता भाजपात जाऊन अशोक चव्हाण यांनी धोका दिला. या जोड गोळीने सातत्याने मतदारांना फसवले आहे मुस्लिम- बौद्धांच्या बळावर राजगादी भोगणाऱ्या या नेत्यांना बहुजनांचे प्रतिनिधीत्व तर संपवलेच परंतु जिल्ह्यातील हरीहरराव सोनुळे , फारूक पाशा, नुरूल्ला खान, साहेबराव बारडकर, शामराव कदम, जयंतराव पाटील वायपनकर, भुजंगराव किन्हाळकर, बाबासाहेब गोरठेकर, कुंटुरकर सारखे दिग्गज मराठे घराणे संपवले आहेत म्हणुन येत्या काळात सर्व बहुजन मतदारांनी ओळखने गरजेचे आहे. यापुढे मतदार गाफील राहिल्यास लोकशाही जिवंत राहणे कठीण आहे. त्यामुळे नांदेडची जनता निश्चितपणे यांना धडा शिकवतील एवढं मात्र निश्चित. नांदेड जिल्ह्यातील मतदारांनी सैरभैर न होता या धोकेबाजांना ओळखून वंचित बहुजन आघाडीच्या सोबत भक्कमपणे उभे राहावे सर्वांचा यथोचित सन्मान केला जाईल. याचे पडसाद येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच बघायला मिळतील असे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow