4 आणि 5 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय तब्लिगी इज्तेमाचे आयोजन, तयारी सुरू
4 आणि 5 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय तब्लिगी इज्तेमाचे आयोजन, तयारी सुरू
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) शहरापासून 40 ते 50km अंतरावर कसाबखेडा येथे 4 व 5 जानेवारी 2025 दोन दिवसीय जिल्हास्तरीय तब्लिगी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी आतापासूनच स्वयंसेवकांनी तयारी सुरू केली आहे. मंडप उभारणी, वजू खाना, ताम कयाम, दवाखाने, पार्किंग व इलेक्ट्रीक काम, रस्ते बनवणे असे विविध कामे इज्तेमागाह येथे सुरू झाली आहे. याठिकाणी पाण्याची व विविध पायाभूत सुविधा उपलब्ध केली जात आहे.
याठिकाणी आयोजकांनी आवाहन केले आहे प्लंबर, इलेक्ट्रीशियन, श्रमदान करण्यासाठी युवकांची गरज आहे. इज्तेमासाठी लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याने विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने काम करत आहे. इज्तेमा देशात अमन शांततेसाठी व देशाच्या प्रगतीसाठी आणि मानवतेचा संदेश देशवासीयांना देण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?