महानगरपालिकेचे वर्ग 3 व 4 संवर्गातील एकूण 19 कर्मचारी सेवानिवृत्त
महानगरपालिकेचे वर्ग 3 व 4 संवर्गातील एकूण 19 कर्मचारी सेवनिवृत्त
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.29
महानगरपालिकेचे वर्ग 3 व 4 संवर्गातील एकूण 19 अधिकारी कर्मचारी नियत वयोमानाने आज सेवनिवृत्त झाले आहेत.
मनपा मुख्यालय येथे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, उप आयुक्त लखीचंद चव्हाण, अंकुश पांढरे, सहायक आयुक्त अभय प्रामाणिक यांची उपस्थिती होती.
सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना सेरोमोनियल कॅप, शॉल, पुष्पगुच्छ, सेवा प्रमाणपत्र व सामान्य भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यात आला. अतिरिक्त आयुक्त यांनी सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना पुढील आनंदी ,स्वस्थ निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सेवा निवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यात अनुक्रमे वर्ग 3 अंतर्गत उप मुख्य स्वच्छता अधिकारी मुकुंद कुलकर्णी सह वर्ग-4 अंतर्गत 13 सफाई मजूर यात रामू कांबळे, पार्वती बाई हिवराळे, विमलबाई
ताकवाले यांचा समावेश आहे. या मध्ये गौतम दाभाडे, भीमराव वाघ ,संजय दाभाडे ,सोमीनाथ मगरे, विनोद ससाणे , भागीरथीबाई सोनवणे, शशिकला शिरसाठ, ताराबाई टाक , सुनीता गायकवाड व सोनाबाई नाडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. तसेच वॉचमन रमेश पाठक, माळी आशाबाई उदावंत, सेविका लिला फिरंगी, शिपाई शंकर बोलकर नियत वयोमानाने सेवा निवृत्त झाले आहेत.
या कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंबीय यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले.
What's Your Reaction?