औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ मतमोजणीसाठी सज्ज...!

 0
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ मतमोजणीसाठी सज्ज...!

१९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघःसज्जता मतमोजणीची...

औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मंगळवार दि.४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.१९- औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची मतमोजणी एमआयटी महाविद्यालय, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी ८ वाजेपासून होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने सज्जता केली आहे, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

 मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने सर्व सज्जता केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. बुधवारी (दि.२९) त्यांनी सर्व सहा. निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी, नोडल अधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली. 

मतमोजणी कर्मचाऱ्यांचे यादृच्छिकीकरण...

मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले यादृच्छिकीकरण दि.२७ मे रोजी झाले आहे. सोमवार दि.३ जून रोजी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत दुसरे विधानसभा मतदारसंघनिहाय यादृच्छिकीकरण होईल. त्यानंतर मंगळवार दि.४ रोजी प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी तिसरे टेबलनिहाय यादृच्छिकीकरण होईल.

मतमोजणीचे वेळापत्रक...

मंगळवार दि.४ जून रोजी पहाटे पाच वा. तिसरे यादृच्छिकीकरण होईल. साडेसहा वा. कर्मचारी त्यानुसार टेबलवर स्थानापन्न होऊन आपल्या साहित्याची तपासणी करतील. सकाळी ८ वा. टपाली मतमोजणीची सुरुवात होईल. तसेच सकाळी साडेआठ वा. मतदान यंत्रांची मतमोजणी सुरु होईल.

निरीक्षकांची नियुक्ती...

मतमोजणीसाठी दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात १०५- कन्नड, १०७ औरंगाबाद (मध्य), १०८- औरंगाबाद(पश्चिम) या तीन विधानसभा क्षेत्रासाठी कांतीलाल दांडे हे भाप्रसेचे अधिकारी निरीक्षक असून १०९-औरंगाबाद(पूर्व),१११-गंगापूर, ११२-वैजापूर साठी किशोरीलाल शर्मा हे निरीक्षक आहेत.

एका विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल व १०४ कर्मचारी...

१९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात १०५- कन्नड, १०७ औरंगाबाद (मध्य), १०८- औरंगाबाद(पश्चिम), १०९-औरंगाबाद(पूर्व),१११-गंगापूर, ११२-वैजापूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधासभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत. ७ टेबलची एक रांग अश्या ह्या दोन रांगा असतील. म्हणजे सहा विधानसभा क्षेत्रासाठी ८४ टेबल असतील. एका टेबल वर रो ऑफिसर ते सारणी भरणारे चमू असे एकूण १०४ कर्मचारी नियुक्त असतील. तर टपाली मतांच्या मोजणीसाठी १० टेबल असून ६८ कर्मचारी नियुक्त आहेत. 

मतमोजणी फेऱ्या...

विधानसभा मतदार संघ निहाय असणाऱ्या मतदान केंद्रनिहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या याप्रमाणे असतील. १०५- कन्नड ३५९ मतदान केंद्र-२६ फेऱ्या, १०७ औरंगाबाद (मध्य) ३१६ मतदान केंद्र- २३ फेऱ्या, १०८- औरंगाबाद (पश्चिम) ३७४ मतदान केंद्र-२७ फेऱ्या, १०९-औरंगाबाद(पूर्व) ३०५ मतदान केंद्र-२२,१११-गंगापूर ३४८ मतदान केंद्र-२५ फेऱ्या, ११२-वैजापूर ३३८ मतदान केंद्र-२५ फेऱ्या अशा एकूण २०४० मतदान केंद्रांसाठी सरासरी २७ फेऱ्या होतील. 

विधानसभा क्षेत्रनिहाय रंग सांकेतांक...

मतमोजणी सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय रंग सांकेतांक देण्यात आले आहेत. १०५- कन्नड- लाल, १०७ औरंगाबाद (मध्य)-पिवळा, १०८- औरंगाबाद(पश्चिम)-गुलाबी, १०९-औरंगाबाद(पूर्व)-राखाडी,१११-गंगापूर-जांभळा, ११२-वैजापूर- नारंगी.

सुरक्षा व्यवस्था...

नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असून आतील व्यवस्था ही केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे असून त्याबाहेरील सुरक्षा राज्य राखीव पोलीस दलाकडे व बाह्य व्यवस्था राज्य पोलीस दलाकडे आहे. याशिवाय संपूर्ण मतमोजणी केंद्राचे ३६० अंशातून सीसीटीव्ही निगराणी होत आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल सह जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या शिवाय स्वतंत्र मिडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचविली जाणार आहे. माध्यम प्रतिनिधींनाही निवडणूक आयोगाने दिलेले प्राधिकार पत्रे प्र

वेशासाठी देण्यात आले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow