नालेसफाईचे. काम संथ गतीने, सभापतींची तीव्र नाराजी...

 0
नालेसफाईचे. काम संथ गतीने,  सभापतींची तीव्र नाराजी...

नालेसफाईचे काम संथ गतीने; स्थायी समिती सभापतींची तीव्र नाराजी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), दि.30(डि-24 न्यूज)- महापालिकेच्या वतीने जाफर गेट, मोती कारंजा, औषधी भवन, संभाजीपेठ आणि समर्थनगर परिसरात सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी केली. यावेळी नालेसफाईचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ काढण्यात आला असला तरी तो अद्याप उचलण्यात आलेला नसल्याचे दिसून आले. यापूर्वीही सभापती मकरिये यांनी वेळोवेळी या कामांची पाहणी केली होती. मात्र, अद्याप काम पूर्णत्वास गेले नसल्याने त्यांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची सर्व कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याने नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा तोंडावर असताना नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी सभापती मकरीये यांनी आज दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow