लंपी चर्मरोग आजाराबाबत सतर्क राहा- जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय

 0
लंपी चर्मरोग आजाराबाबत सतर्क राहा- जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय

लंपी चर्मरोग आजरा बाबत सतर्क राहा जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांचे पशुपालकांना आवाहन

 औरंगाबाद, दि ,18 (डि-24 न्यूज)

औरंगाबाद जिल्हयात जनावरांमध्ये लंपी चर्मरोग आजार रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव जिल्हयात पसरू नये याची काळजी पशुपालकांनी घेण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी

अस्तिक कुमार पाण्डेय यांनी आवाहन केले आहे.

या रोगात जनावरांना खुप ताप येतो जनावर चारा पाणी कमी घेते अथवा घेणे बंद करते, नाका डोळयातून चिकट स्त्राव येतो, जनावरांच्या अंगावर गाठी येतात आणि पायावर सूज येऊन जनावर लंगडते अशी सर्वसाधारण लक्षणे दिसून येतात बाधीत जनावर इतर निरोगी जनावरांपासून वेगळे करून त्याची सूचना नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास देऊन पूढील उपचार करून घ्यावेत. तसेच या रोगाचा प्रसार डास, माशा गोचीड, चिलटे आदीमार्फत होत असल्याने गोठयाच्या व जनावरांच्या स्वच्छतेची काळजी घेण्यात यावी . गोठयात बाहय किटकनाशकाची फवारणी करून घ्यावी या रोगाची लक्षणे, उपचार प्रतिबंधक उपाय आणि पशुपालकांनी घ्यावयाची काळजी या संदर्भात पशुसंवर्धन विभागामार्फत "माझा गोठा स्वच्छ गोठा" अभियान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या जनावरांवर वेळीच उपचार करून आजारी जनावरांना वेगळे ठेवावे, जिल्हयात या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे संपुर्ण उपाय-योजना करण्यात येत आहेत.

रोगनियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधीत गावामध्ये व बाधीत गावापासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणा-या सर्व गावामधील ४ महिने वयावरील गाय वर्गातील जनावरांना नजिकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे .बाधीत जनावरांना औषधोपचार करून घ्यावे .रोग प्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी असे डॉ.पी.डी.झोड , जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त औरंगाबाद यांनी सांगितले.

प्राण्यांमधील संक्रमक आणि सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये लंपी चर्मरोग प्रादुर्भावाची माहिती पशुपालक, ईतर कोणतीही व्याक्ती शासनेतर संस्था,सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस प्रशासनास देणे बंधनकारक असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow