छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात पोस्टर्स, बॅनर लावण्यास बंदी...!
छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात पोस्टर्स, बॅनर्स लावण्यास बंदी; जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)- औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक 2026 ची आचारसंहिता लागू झाली असून, या काळात रहदारीस अडथळा ठरणारे किंवा अपघात घडू शकणारे राजकीय प्रचार साहित्य लावण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33(1) (घक) अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
हे आदेश दिनांक 25 मे 2026 पासून ते 25 जून 2026 पर्यंत (निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत) लागू राहतील.
सार्वजनिक इमारती, सार्वजनिक रस्ते आणि त्यांच्या परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाला, उमेदवाराला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्पलेट्स, कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी लावण्यास आणि घोषवाक्ये लिहिण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या प्रचार साहित्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
What's Your Reaction?