उद्या सकाळी शहरातील या भागात वीजपुरवठा बंद राहणार...!
उद्या सकाळी शहरातील या भागात वीजपुरवठा बंद राहणार...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) - औरंगपुरा, समर्थ नगर, टिळक पथ, गुलमंडी दलालवाडी, पैठण गेट, तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार, नागेश्वर वाडी, प्रणव प्लाझा,धन मंडी, कुंभारवाडा वरद गणेश मंदिर रोड, चिंतामणी कॉलनी, अदालत रोड, क्रांती चौक पोलीस स्टेशन परिसर, सेंट्रल बस स्टँड परिसर, कमिशनर ऑफीस एरिया, भडकल गेट, मिल कॉर्नर. भोईवाडा, खडकेश्वर, नारळी बाग, गरम पाणी, घाटी परिसर ,बाबा पेट्रोल पंप, म्हाडा कॉलनी, अदालत रोड, एबीसी कॉम्प्लेक्स, एलआयसी ऑफिस येथील वीज ग्राहकांना सुचित करण्यात येते की उद्या दिनांक 31 /05 /2026 रोजी सकाळी 7:00 ते 11:00 पर्यंत महावितरण कंपनी तर्फे 33 KV व 11 KV लाईन, 33 KV उपकेंद्र यावर मान्सून पूर्व तातडीचे देखभाल दुरुस्तीची कामे करणे आवश्यक असल्याने सकाळी 7:00 ते 11:00 वाजेपर्यंत परिसरातील सर्व वीज पुरवठा बंद राहील याची नोंद घेऊन आपले दैनंदिन कामाचे नियोजन करावे जेणेकरून विद्युत पुरवठा बंद झाल्यानंतर अचानक गैरसोय होणार नाही. काम झाल्यानंतर ताबडतोब वीज पुरवठा सुरळीत चालू होईल. तरी सर्व महावितरण कंपनीच्या सन्माननीय विज ग्राहकांनी महावितरण कंपनी सहकार्य करावे.
अशी माहिती महावितरणच्या 33/11 kv उपकेंद्र
पॉवर हाऊस मिल कॉर्नर यांनी दिली आहे.
What's Your Reaction?