वृध्द EPS-95 पेन्शनधारकांनी केले धरणे आंदोलन...!

 0
वृध्द EPS-95 पेन्शनधारकांनी केले धरणे आंदोलन...!

वृध्द EPS-95 पेन्शनधारकांनी केले धरणे आंदोलन...!

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) आपल्या मागणीसाठी दिल्लीत वृध्द EPS-95 पेन्शनधारकांनी मोर्चा काढला. त्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

देशातील 72 लाख केंद्र व राज्य सरकारच्या सार्वजनिक उपक्रम, सहकार, मंडळ, खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी देशाची सेवा केली आहे. त्यांना अत्यंत कमी पेन्शन मिळत असल्याने जीवन जगने कठीण आहे त्यामध्ये आरोग्य सुविधा सुध्दा भागत नाही. या पेन्शनमध्ये वाढ करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करत आहे.

पेन्शन फंडात सरकारी नियमानुसार 417 रुपये, 541, 1250 रुपये प्रती माह जमा केले तरी 1170 रुपये अत्यल्प पेन्शन मिळत आहे आता या पेन्शनमध्ये वाढ करुन 7500 पेन्शन करण्यात यावी. महागाई भत्ता मंजूर करुन कोश्यारी समिती शिफारस नुसार भत्ता तीन हजार रुपये देण्यात यावे. पती पत्नीला आरोग्य सुविधा द्यावी. ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना EPS -95 योजनेत समावेश करावे अथवा त्यांना पाच हजार रुपये पेन्शन लागू करावी या मागणीसाठी आंदोलन केले. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली. यावेळी जेष्ठ पेन्शन धारक हारुण पठाण, किशनराव साळवे, विनायक देशपांडे, बी.एस.शिलवंत, जे.ए.विटेकर, डी.पी.गाढे, के.आर.मोरे, दशरथ गंगातिरे, सखाराम जोगदंड, अशोक जैस्वाल, सौ.प्रतिभा साखरे, रावसाहेब गायकवाड, संतोष वैजापूरकर, भागिरथ मोरे, इंगळे यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow