जनार्दन कसारे खून प्रकरणी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी

 0
जनार्दन कसारे खून प्रकरणी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी

जनार्दन कसारे खून प्रकरणी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) 18 ऑगस्ट 2022 रोजी पिसादेवी येथील जनार्दन कोंडीबा कसारे यांचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणात विशेष सरकारी वकील राजेंद्र मुगदीया यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी सकल मातंग समाज व कसारे कुटुंबाने निवेदनाद्वारे केली होती. परंतु शासनाने नकार दिल्याने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकल मातंग समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

सरकारने विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यासाठी पुनर्विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तात्काळ निर्णय घेतला नाही तर नागपूर हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सकल मातंग समाजाचे समन्वयक संतोष शंकरराव पवार, साईनाथ जनार्दन कसारे व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow