नाहिदनगर-बाबर काॅलनीत काळोख, महावितरणची अरेरावीची भाषा...!

 0
नाहिदनगर-बाबर काॅलनीत काळोख, महावितरणची अरेरावीची भाषा...!

नाहीदनगर-बाबर काॅलनी काळोखात, महावितरणचा भोंगळ कारभार...! विज नसल्याने घराबाहेर बसून रात्र काढण्याची वेळ 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - शहारातील काही भागात विजेचा लपंडाव सुरुच आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाली तरीही तांत्रिक बिघाड होत असल्याने तापत्या उन्हात व वाढलेल्या तापमानामुळे घामाघुम होण्याची वेळ नाहीदनगर व बाबर काॅलनीच्या नागरिकांवर आल्याने महावितरणवर ग्राहक राग व्यक्त करत आहेत. रात्री 9 वाजता एम्पायरल लाॅन्स जवळील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने वीज गुल झाली आहे. महावितरणचे अधिकारी ग्राहक फोन करत असताना अरेरावीची भाषा करत असल्याचे एका वीज ग्राहकाने सांगितले. ट्रान्सफाॅर्मर दुरुस्तीचे काम सुरू झाले नसल्याने वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी सकाळ उजाडणार अशी परिस्थिती आहे. जेष्ठ नागरिक व लहान बालकांना वीज नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. लवकर वीज पुर्ववत करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. नगरसेवकांना फोन करून वीज पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow