पडेगाव येथे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी घेतला मेळावा...

 0
पडेगाव येथे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी घेतला मेळावा...

पंतप्रधान आवास योजना लाभार्थ्यांनी यशस्वी करावी - अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे

गरीबांच्या स्वप्नाच्या घरासाठी प्रक्रीयेत अथक परिश्रम घेणारे मनपा उपायुक्त अपर्ना थेटे झाल्या भावूक... कामगार मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांना लाभ मिळवून देण्यासाठी मनपा प्रशासन करणार प्रयत्न...

छत्रपती संभाजीनगर, दि.14(प्रतिनिधी) - पंतप्रधान आवास योजने अंतर्गत महापालिकेच्या वतीने शहरात 5 ठिकाणी गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. लकी ड्रामध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना 22 मे पर्यंत दहा टक्के रक्कम जमा करावी लागणार आहे. लाभार्थ्यांसाठी बँकेकडून कर्ज मंजूरीची प्रक्रीया सुरू झाली आहे. लाभार्थ्यांना एकाच छताखाली मनपाने बँक, विकासक यांच्यासोबत पडेगाव येथील साईडवर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बँकेचे प्रतिनिधी, लाभार्थी व इच्छुक नागरीक उपस्थित होते. बँकेच्या प्रतिनिधींनी घरासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची, व्याज व भरावा लागणारा हप्ता आदींची सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले शासन आपल्याला स्वप्नातील घर मिळावे यासाठी अडीच लाख रुपये अनुदान देत आहे. यासाठी आपले स्वतःचे दहा टक्के रक्कम नियमानुसार भरणे अनिवार्य आहे. लाभार्थ्यांना घराची चाबी लवकर मिळावी यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. यासाठी लाभार्थ्यांनी पुढे यावे नवीन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया व लकी ड्रॉ केले जात आहे. मनपा, बँक, विकासक आणि लाभार्थी हे या योजनेचे चार पिल्लर आहेत हे मजबूत राहिले तरच हि योजना पूर्णत्वास येईल. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज कमी कागदपत्रांमध्ये कर्ज मिळावे. टप्प्याटप्प्याने हप्ते बनवून दिले जाणार आहे. बँकेने कर्ज मंजूर करून लवकर दिले तर विकासकाला दिलेल्या मुदतीच्या आत काम पूर्ण करण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेत सदनिका शिल्लक आहेत तर यासाठी नवीन अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरुन योजनेचा लाभ घेता येईल असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

मनपा प्रशासन लाभार्थ्यांना सन 2017 पासून सहकार्य करत आहे. पुढेही करत राहणार आहे. सरकारी अथवा खाजगी बँकेकडून कर्ज लाभार्थी घेवू शकतात. लाभार्थ्यांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या मुख्यालयासमोर कला दालन येथे विकासक आणि बँकेचे प्रतिनिधी सल्ला देण्यासाठी बसणार आहे याचा लाभ घ्यावा. अशी माहिती मनपा उपायुक्त अपर्ना थेटे यांनी दिली. मागिल अनेक वर्षांपासून हि योजना प्रक्रीयेत त्यांचा सहभाग राहिला आहे. गरीबांना स्वप्नांचे घर मिळावे यासाठी ते नेहमी धडपड करत आहे म्हणून मार्गदर्शन करताना त्या भावूक झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. याप्रसंगी मोठ्या संख्येने पडेगाव पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी कुटुंबासह उपस्थित होते. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे अधिकारी, बँकेचे प्रतिनिधी व मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शंकेचे निरसन केले. 

आवास फायनान्स, स्वतंत्र फायनान्स, वंडर फायनान्स, टायगर फायनान्स, आय आय एफ एल फायनान्स, पिरामल फायनान्स, एसबीआय बँक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, मनपा उपायुक्त अपर्ना थेटे, उप अभियंता आरती नवगिरे, माहिती व तंत्रज्ञ शेख नाजीया, विकासक रियाज खान बिस्मिल्ला खान, विकासक रेहान खान अन्वर खान, आर्किटेक्ट स्वप्नील सराफ, प्रकल्प सल्लागार लक्ष्मीकांत सुर्वे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थापत्य अभियंता अर्जुन फापळे यांनी केले.

हर्सुल येथे 16, 17 रोजी मेळावा...

हर्सुल गट क्रमांक 216 मध्ये घरकुल योजनेअंतर्गत प्रकल्प उभारण्यात येत आहे. लकी ड्रॉ मध्ये घर मिळालेल्या लाभार्थ्यांसाठी 16 आणि 17 मे रोजी मनपा व सारा बिल्डर्स यांच्यातर्फे हर्सुल येथे मेळावा घेण्यात येणार आहे या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त अपर्ना थेटे यांनी केले आहे.

महापालिका मुख्यालयासमोर कला दालन येथे उद्यापासून बँकेचे प्रतिनिधी व विकासक बसणार आहे ते लाभार्थ्यांना पुढील कारवाई साठी सहकार्य कर

णार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow