नामांतरावर झाली सविस्तर सुनावणी, उद्याही होणार सुनावणी

 0
नामांतरावर झाली सविस्तर सुनावणी, उद्याही होणार सुनावणी

नामांतरावर झाली सविस्तर सुनावणी... उद्याही होणार सुनावणी...

मुंबई, दि.7(डि-24 न्यूज) औरंगाबाद शहराच्या नामांतरावरावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उद्याही सुनावणी होणार आहे यानंतरच निकाल अपेक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. आज झालेल्या सुनावणीत नामांतरावरावर याचिकाकर्ते मुश्ताक अहमद यांचे वकील एड युसुफ मुशाला यांनी युक्तिवाद करताना औरंगाबादचा इतिहास व नामांतरावरावर विविध न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रकाश टाकला. उद्या याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांचे जेष्ठ वकील अनिल अंतुरकर, एड एस.एस.काझी युक्तिवाद करतील अशी माहिती मिळाली आहे.

औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव शासनाने करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. या दोन्ही प्रकरणांत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. औरंगाबाद विभाग, जिल्हा, तालुका, गाव व त्याच प्रमाणे उस्मानाबाद जिल्हा, तालुका, गाव नामांतरावर सुनावणी झाली पण निकाल राखून ठेवला आहे. 

 यावेळी याचिकाकर्ते मुश्ताक अहमद, याचिकाकर्ते हिशाम उस्मानी यांचे वकील एड एस.एस.काझी, त्यांचे असि.एड शेख मोईन, उस्मानाबाद नामांतर विरुद्ध याचिकाकर्ता व त्यांचे वकील एड सतीश तळेकर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow