मंदीरासमोर भरधाव कार चालकाने 6 जणांना उडवले, दोन जणांचा मृत्यू...?

 0
मंदीरासमोर भरधाव कार चालकाने 6 जणांना उडवले, दोन जणांचा मृत्यू...?

मंदीरासमोर भरधाव कार चालकाने 6 जणांना उडवले, दोन जणांचा मृत्यू...? सर्व्हिस रोडवर सुध्दा लोक सुरक्षित नाही...शहरात शोककळा, नागरीकांमध्ये संताप

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) 

आज सकाळी 8.30 वाजेच्या दरम्यान सिडकोतील काळा गणपती मंदीरासमोर एका कारचालकाने सहा जणांना उडवले. या भिषण अपघातात मंदीरचे सुरक्षा रक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे, वय 60, राहणार एन-2, विठ्ठल नगर, छत्रपती संभाजिनगर यांचा जागिच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. या घटनेत दुस-या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहीती आहे परंतु नाव समजले नाही असे एमआयडिसी पोलिसांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत एकनाथ मगर, वय 30, राहणार सिडको, छत्रपती संभाजिनगर हा गारखेडा येथील क्रीडा संकुल येथून टेनिस खेळून परतला होता. काळा गणपती मंदीरासमोर स्विफ्ट डिझायर कार क्रं.MH-20, HH-0746 वरील ताबा सुटल्याने हा भिषण अपघात घडला. 

मंदीरासमोर टर्न घेताना त्याने निष्काळजीपणे भरधाव वेगाने कार चालवत रस्त्यावर चालणा-या नागरीकांना धडक दिली. यामध्ये सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे, वय 60 हे गंभीर जखमी होऊन या घटनेत त्यांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहे. जखमी विकास समधाने, वय 50 व मनिषा विकास समधाने, वय 40, यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविंद्र भगवंतराव चौबे, वय 65, श्रिकांत प्रभाकर राडेकर, वय 69 यांना चिकलठाणा येथील मिनी घाटीत प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नातेवाईक अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवत असल्याची माहिती आहे.

व्हिडीओ बघितले असता असे दिसून येते नेहमीप्रमाणे जेष्ठ नागरीक दर्शनासाठी मंदीरात येतात. अचानक त्यांच्या दिशेने एक भरधाव कार आली. रस्त्यावर चालणा-या चौघासह एक महीला मंदीराच्या पाय-यावर चप्पल काढणा-या महीलेलाही उडवले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असे सिसिटीव्हित दिसत आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे. कारचालक प्रशांत मगर याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात एमआयडिसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले कारचा वेग खूप जास्त होता चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती गर्दीत घुसली. यामुळे परिसरात गोंधळ उडाला. रस्त्यावर रक्ताचे थारोळे बघून अंगावर शहारे येत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले. अपघाताचे कारण पोलिस चौकशीत समोर येईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow